उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 08:14 PM2024-05-20T20:14:16+5:302024-05-20T20:16:46+5:30

उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद लोकसभा जागेवर बनावट मतदानाच्या प्रकरणात आणखी अनेक खुलासे झाल्याने खळबळ उडाली आहे. येथे निवडणूक आयोगाने २५ मे रोजी पुन्हा मतदान घेण्याची घोषणा केली आहे.

lok sabha election 2024 fake voting in up many more revelations cause panic re polling to be held on may 25 | उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान

उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद लोकसभा मतदारसंघातील एटा येथील अलीगंज विधानसभा मतदारसंघात बनावट मतदानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर खळबळ उडाली होती. निवडणूक आयोगाने कारवाई करत अधिकाऱ्यांना निलंबित केले असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या किशोरलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तपासात अनेक खुलासे झाले आहेत. या बूथवर ६९.२२ टक्के मतदान झाल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये फक्त दहा जणांनी मतदार ओळखपत्राचा वापर केला आहे. 

किशोरने स्वत: व्हिडीओ बनवून पोस्ट केला नसता तर हा प्रकार समोर आला नसता. भाजपसह विरोधी पक्ष प्रशासनावर आरोप करत आहे. सध्या आयोगाने येथे फेरमतदानाची तारीखही जाहीर केली आहे. येथे २५ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  

फर्रुखाबाद लोकसभा जागेसाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान झाले. एका आठवड्यानंतर, रविवारी, येथील अलीगंज विधानसभा मतदारसंघातील खिरिया पावरण यांच्या बूथचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक किशोर एक-एक करून बूथच्या आत जाऊन भाजप उमेदवाराला मत देत आहे. यासोबतच तो मोबाईलवरून व्हिडिओही बनवत आहे. तो ज्या पद्धतीने मतांची मोजणी करत आहे, त्यावरून जणू त्याला कोणीतरी बनावट मतदानाचे काम दिले असल्याचे बोलले जात आहे. 

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे. अखिलेश यादव यांची पोस्ट रिपोस्ट करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे सरकार स्थापन झाल्यास अशा लोकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी तपास सुरू केला आणि काही तासांतच बूथवर तैनात असलेले अधिकारी निलंबित करून किशोरला अटक करण्यात आली. पोलिसांनी मतदान अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तेथे मतदान करणाऱ्यांपैकी फक्त १० जणांनी मतदान कार्ड वापरल्याचे तपासात समोर आले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट मतदान करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

Web Title: lok sabha election 2024 fake voting in up many more revelations cause panic re polling to be held on may 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.