कोण आहे मोहम्मद कासिम गुज्जर? ज्याला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 06:41 PM2024-03-07T18:41:41+5:302024-03-07T18:42:52+5:30
Terrorist Mohammad Qasim Gujjar : लष्कर-ए-तैयबाचा सदस्य मोहम्मद कासिम गुज्जर याचा अनेक दहशतवादी हल्लांमध्ये समावेश आहे.
Terrorist Mohammad Qasim Gujjar : (Marathi News) नवी दिल्ली : केंद्री गृह मंत्रालयाने (Ministry Of Home Affairs) गुरुवारी लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) सदस्य मोहम्मद कासिम गुज्जर (Mohammad Qasim Gujjar) याला दहशतवादी म्हणून घोषित केले. मोहम्मद कासिम गुजर सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राहत आहेत. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 (UAPA) अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार मोहम्मद कासिम गुज्जर दीर्घकाळापासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र, दारूगोळा, आयईडीसह अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. लष्कर-ए-तैयबाचा सदस्य मोहम्मद कासिम गुजर याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 अंतर्गत 'दहशतवादी' म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे गृह मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
Ministry of Home Affairs (MHA) declares Lashkar-e-Taiba member Mohammad Qasim Gujjar, presently residing in Pakistan Occupied Kashmir, as a terrorist under the Unlawful Activities (Prevention) Act, 1967. pic.twitter.com/D8AjkPxXYM
— ANI (@ANI) March 7, 2024
मोहम्मद कासिम गुज्जर हा जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचा संबंध लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी आहे. मोहम्मद कासिम गुज्जर हा ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) पुरवतो. याने अनेक दहशतवादी हल्लेही केले आहेत. तसेच, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करत असतो.
याचबरोबर, लष्कर-ए-तैयबाचा सदस्य मोहम्मद कासिम गुज्जर याचा अनेक दहशतवादी हल्लांमध्ये समावेश आहे. त्याच्या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. भारताविरुद्ध युद्धाची योजना आखण्यात त्याचा सहभाग आहे. त्यामुळे देशाची एकता आणि अखंडतेच्या विरोधात कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.