लय भारी! 24 वर्षीय लेक अन् 42 वर्षीय आईची PSC परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी, मिळाली सरकारी नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:38 AM2022-08-10T10:38:28+5:302022-08-10T10:45:15+5:30

केरळच्या मलप्पुरममधील 42 वर्षीय आई (बिंदू) आणि तिचा 24 वर्षीय मुलगा (विवेक) यांनी लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. त्यांच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. 

kerala mother and son pass psc exam together lesson for those preparing for recruitment exams | लय भारी! 24 वर्षीय लेक अन् 42 वर्षीय आईची PSC परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी, मिळाली सरकारी नोकरी

लय भारी! 24 वर्षीय लेक अन् 42 वर्षीय आईची PSC परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी, मिळाली सरकारी नोकरी

googlenewsNext

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. मायलेकाने एकाचवेळी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. केरळच्या मलप्पुरममधील 42 वर्षीय आई (बिंदू) आणि तिचा 24 वर्षीय मुलगा (विवेक) यांनी लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. त्यांच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना विवेकने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही एकत्र कोचिंग क्लासला जायचो. माझ्या आईने मला या पदापर्यंत पोहचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तर माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केली. आम्हाला आमच्या शिक्षकांकडून खूप प्रेरणा मिळाली. आम्ही दोघे एकत्र शिकलो पण आम्ही एकत्र पात्र होऊ असे कधीच वाटले नव्हते. आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत."

बिंदू या गेल्या 10 वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत. आईच्या अभ्यासाबद्दल सांगताना विवेकने एका टीव्ही चॅनलला सांगितले की, आई नेहमी अभ्यास करू शकत नव्हती. तिला वेळ मिळेल तेव्हा आणि अंगणवाडीच्या ड्युटीनंतर ती अभ्यास करू लागली. त्याच वेळी, बिंदूने सांगितले की त्यांनी 'लास्ट ग्रेड सर्व्हंट' (एलडीएस) परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि 92 वा रँक मिळवला आहे, तर त्याचा मुलगा विवेक लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे आणि त्याला 38 वा रँक मिळाला आहे.

बिंदू यांनी सांगितले की, त्यांनी दोनदा एलडीएससाठी आणि एकदा एलडीसीसाठी प्रयत्न केले होते. त्याचा हा चौथा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला. आयसीडीएस सुपरवायझर परीक्षा हे त्याचे खरे लक्ष्य होते आणि एलडीएस परीक्षा उत्तीर्ण होणे हा 'बोनस' आहे. आई आणि मुलाने अशाप्रकारे एकाच वेळी मिळवलेलं यश सर्वांना प्रेरणा देत असून याची तुफान चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: kerala mother and son pass psc exam together lesson for those preparing for recruitment exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Keralaकेरळ