हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 09:54 AM2024-05-02T09:54:22+5:302024-05-02T09:57:06+5:30

Himachal Pradesh Accident News: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्कूटीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रैनाच्या मामेभावासह दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात हिमाचल प्रदेशमधील कांग्रा जिल्ह्यामध्ये झाला.

Hit and run Case: Team India's Former Cricketer Suresh Raina's Brother Died in Accident | हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   

हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्कूटीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रैनाच्या मामेभावासह दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघातहिमाचल प्रदेशमधील कांग्रा जिल्ह्यामध्ये झाला. अपघातानंतर आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच हा अपघात कसा झाला याचा तपास केला जात आहे.

या अपघताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांग्रामधील गग्गल येथे हिमाचल टिंबरजवळ टॅक्सीचालकाने भरधाव आणि बेदरकारपणे कार चालवून स्कूटीला धडक दिली. त्यानंतर हा टॅक्सीचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात सौरभ कुमार आणि शुभम यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी कारचालकाचा पाठलाग केला. तसेच त्याला मंडी येथून अटक केली. आरोपी कारचालकाचं नाव शेरसिंह असं आहे.

कांग्राच्या एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा देताना गगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री हीट अँड रनची ही घटना घडल्याचे सांगितले. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, सौरभ आणि शुभम अशी त्यांची नावं आहेत. आरोपीला मंडी येथून अटक करण्यात आली असून, त्याला कांग्रा येथे आणण्यात येत आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाकल करून पुढील कारवाई करण्यात येईल.  

Web Title: Hit and run Case: Team India's Former Cricketer Suresh Raina's Brother Died in Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.