Exit Poll Karnataka 2023 : कर्नाटकात कोणाची सत्ता येणार, काँग्रेस-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’, जेडीएस ठरणार किंगमेकर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 07:21 PM2023-05-10T19:21:31+5:302023-05-10T19:21:49+5:30

१३ मे रोजी मतमोजणी पार पडणार असून राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर आले आहेत.

Exit Poll Karnataka 2023 Who will come to power in Karnataka election tough fight between Congress BJP JDS might be the kingmaker | Exit Poll Karnataka 2023 : कर्नाटकात कोणाची सत्ता येणार, काँग्रेस-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’, जेडीएस ठरणार किंगमेकर?

Exit Poll Karnataka 2023 : कर्नाटकात कोणाची सत्ता येणार, काँग्रेस-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’, जेडीएस ठरणार किंगमेकर?

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील २२४ जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालं आहे. या जागांसाठी मतदान संपलं असून आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. दरम्यान, आता एक्झिट पोल समोर आले असून काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे जेडीएस किंगमेकर ठरण्याचीही शक्यता आहे.  

झी आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यांना १०३-११८ जागा, तर भाजपला ७९-९४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर एक्झिट पोलनुसार जेडीएसला २५-३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्यच्या खात्याता २ ते ५ जागा जाऊ शकतात.

रिपब्लिक टीव्ही आणि पी पार्कद्वारे कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज बांधण्यात आलाय. यामध्ये सत्ताधारी भाजपला ८५-१००, काँग्रेसला ९४-१०८ आणि जेडीएसला २४-३२ जागा आणि अन्यच्या खात्याता २ ते ६ जागा जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

टीव्ही ९ पोल काय म्हणतो?

टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात आल्यात. टीव्ही ९ नुसार भाजपला ८८ ते ९८ जागा, काँग्रेसला ९९ चे १०९ जागा आणि जेडीएसच्या खात्यात २१-२६ जागा जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

तर पोलस्ट्रॅटच्या अंदाजानुसार राज्यात भाजपला ८८-९८, काँग्रेसला ९९ ते १०९ जागा मिळू शकतात असं म्हटलंय. तर जेडीएसच्या खात्यात २१ ते २६ जागा जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

काय म्हणतो सी-वोटर्सचा सर्व्हे?
सी वोटर्सनुसार कर्नाटकात भाजपला ८३ ते ९५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर काँग्रेसला १००-११२, जेडीएसला २१-२९ आणि अन्यना २ ते ६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

तर जन की बातच्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकात भाजपला ९४-११७, काँग्रेसला ९१-१०६, जेडीएसला १४-२४ आणि अन्यना ०-२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दर ५ वर्षांनी सत्ताबदल

कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपला कर्नाटकात दर ५ वर्षांनी सत्ता बदलण्याचा ३८ वर्षांचा ट्रेंड तोडायचा आहे. तर दुसरीकडे काँग्रेस यावेळी पुन्हा सत्तेत येईल असा दावा करत आहे. २०१८ प्रमाणे आपण किंगमेकर ठरू शकतो अशी जेडीएसला अपेक्षा आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

कोणाला कधी आणि किती जागा?

१९९९ च्या निवडणुकीत भाजपला ४४, तर काँग्रेसला १३२ आणि जेडीएसला १० जागा मिळाल्या होत्या. तर २००४ आणि २००८ च्या निवडणुकांत भाजप मोठा पक्ष ठरला होता. २००४ मध्ये भाजपला कर्नाटकात ७९, काँग्रेसला ६५ आणि जेडीएसला ५८ जागा, आणि २००८ मध्ये काँग्रेसला ८०, भाजपला ११० आणि जेडीएसला २८ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. २०१३ मध्ये पुन्हा काँग्रेसनं मुसंडी मारली होती. या निवडणुकांत काँग्रेसला १२२ जागा मिळाल्या होत्या. तर जेडीएस आणि भाजपला ४०-४० जागा मिळाल्या होत्या. २०१८ च्या निवडणुकांमध्ये भाजपला १०४, काँग्रेसला ७८ आणि जेडीएसला ३७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

Read in English

Web Title: Exit Poll Karnataka 2023 Who will come to power in Karnataka election tough fight between Congress BJP JDS might be the kingmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.