Emotional Story: ढोकळा खाताच ठसका लागला; मुंबईच्या नववधू डॉक्टरचा हळदीच्या दिवशीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 11:05 AM2022-05-20T11:05:30+5:302022-05-20T11:12:24+5:30

महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि मुंबईतच प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला आहे. मेघा काळे असे या तरुणीचे नाव आहे.

Emotional Story: Mumbai's doctor Bride Megha Kale Death After Ate Dhokla in her marriage ceremany | Emotional Story: ढोकळा खाताच ठसका लागला; मुंबईच्या नववधू डॉक्टरचा हळदीच्या दिवशीच मृत्यू

Emotional Story: ढोकळा खाताच ठसका लागला; मुंबईच्या नववधू डॉक्टरचा हळदीच्या दिवशीच मृत्यू

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये एका लग्नघरावर अचानक शोककळा पसरली आहे. दुसऱ्या दिवशी या डॉक्टर तरुणीचे लग्न होणार होते. परंतू हळदीच्या दिवशीच तिला मृत्यूने गाठले. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि मुंबईतच प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला आहे. मेघा काळे असे या तरुणीचे नाव आहे. बुधवारी बाजारमधील प्रमोद महादेवराव यांची ती मुलगी होती. तीचे लग्न होते. नाश्त्यामध्ये ढोकळा हा पदार्थ होता. मेघा ढोकळा खात होती, तेव्हा तिला अचानक ठसका लागला, लगेचच तिने पाणी पिले. मात्र तिला काहीच बोलता येत नव्हते. यामुळे तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिचा मृत्यू झाला. 

मेघा काळे एमबीबीएस झाली होती. ती मुंबईत प्रॅक्टिस करत होती. तिचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये झाले होते. पुढचे शिक्षण तिने नाशिक आणि मुंबईत घेतले होते. छिंदवाडाच्या शहनाई लॉनमध्ये २० मे म्हणजे आज तिचे लग्न होते. परंतू हळदीच्या दिवशीच तिला मृत्यूने गाठले. 

पोलिसांनी नाश्तातील नमुने गोळा केले आहेत. मेघाच्या मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. हे नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मेघाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टची पोलीस वाट पाहत आहेत, यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. याबाबतचे वृत्त आज तकने दिले आहे. 

Web Title: Emotional Story: Mumbai's doctor Bride Megha Kale Death After Ate Dhokla in her marriage ceremany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.