रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 02:25 PM2024-05-06T14:25:38+5:302024-05-06T14:26:05+5:30

ईडीने काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयाकडून बेहिशेबी रोकड जप्त केली. नोटांचा ढीग पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले.

ED-raid-in-Ranchi-congress-leader-alamgir-alam-reaction-on-ed-recovers-cash | रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया

रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया

ED raid in Ranchi : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) झारखंडची राजधानी रांचीमध्ये सोमवारी(दि.6 मे) अनेक ठिकाणी छापे टाकले आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा काँग्रेस नेते आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयाकडून बेहिशेबी रोकड जप्त केली. नोटांचा ढीग पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले. इतक्या नोटा आहेत की, त्या मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या. 25-30 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या रोकडशिवाय काही कागदपत्रेही समोर आली असून, हे पैसे ट्रान्स्फर पोस्टिंगसाठी घेतल्याचा अधिकाऱ्यांना संश आहे. 

आलमगीर आलम यांची पहिली प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यात आलमगीर आलम यांचे खाजगी सचिव असलेले संजीव लाल, यांच्या नोकराच्या घरात नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिसत आहेत. आता याप्रकरणी मंत्री आलमगीर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजीव लाल आमचे पीएन आणि सरकारी अधिकारी आहेत. याआधीही ते दोन मंत्र्यांचे पीए होते. अनुभवाच्या आधारे आम्ही सचिवांची नियुक्ती करतो. मी टीव्हीवरच कारवाईची बातमी पाहिली. ईडी आपले काम करत आहे, निष्पक्ष तपास होईपर्यंत त्यावर काहीही बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आलमगीर आलम यांनी दिली.

ईडीने आलमगीर यांना तात्काळ ताब्यात घ्यावे - भाजपची मागणी
दरम्यान, यावरुन भाजपने आलमगीर यांना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे. झारखंड भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या रोकड वसुलीने काँग्रेस काळ्या पैशाच्या व्यवसायात गुंतल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. झारखंड सरकारच्या भ्रष्टाचाराची न संपणारी कहाणी अजूनही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच एका काँग्रेस खासदाराच्या घरातून 300 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्या घरातून 10 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आता मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवच्या नोकराच्या घरातून 23-30 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. आलमला तात्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि त्यांची सखोल चौकशी करुन या पैशांशी काय संबंध आहे, याचा ईडीने शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
 

Web Title: ED-raid-in-Ranchi-congress-leader-alamgir-alam-reaction-on-ed-recovers-cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.