'प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली...', 'त्या' वक्तव्यावरुन भाजपची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:32 PM2023-03-24T20:32:48+5:302023-03-24T20:33:26+5:30

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक वक्तव्य केले होते. जाणून घ्या काय म्हणाले होते...

'Dear Rahul Gandhi, your wish has been fulfilled...', BJP's criticism from 'that' statement | 'प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली...', 'त्या' वक्तव्यावरुन भाजपची खोचक टीका

'प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली...', 'त्या' वक्तव्यावरुन भाजपची खोचक टीका

googlenewsNext

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे खासदार होते. मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने निकाल दिला आणि त्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. या निर्णयामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसकडून या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. त्याचबरोबर राहुल यांना आम आदमी पक्षापासून ते तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकपर्यंत अनेकांचा पाठिंबा मिळत आहे.

या सगळ्यात भाजपने राहुल गांधींना 'मी दुर्दैवाने खासदार आहे!' या वक्तव्याची आठवण करुन दिली आणि खोचक टोलाही लगावला. कर्नाटक भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले की, "प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली! काही दिवसांपूर्वी तुम्ही दुर्दैवाने खासदार असल्याचे मान्य केले होते! आता न्यायालयाच्या निर्णयाने तुमची इच्छा सत्यात उतरली आहे," असा टोला भाजपने लगावला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर राहुल गांधी यांनी 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन भाजपला प्रत्युत्तर दिले होते. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांना भाजपच्या आरोपांना सभागृहात उत्तर द्यायचे आहे. पण त्यांना संसदेत बोलू दिले जाईल, असे वाटत नाही. राहुल पुढे म्हणाले, दुर्दैवाने मी एक खासदार आहे आणि मला आशा आहे की मला संसदेत बोलू दिले जाईल. 

यादरम्यान बाजुला बसलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधींची 'दुर्दैवाने' चूक पकडली आणि तात्काळ राहुल यांना रोखून चुक सुधारण्यास सांगितले. यावेळी माईकमध्ये जयराम रमेश काय म्हणाले, ते स्पष्टपणे ऐकू आले. "तुम्ही दुर्दैवाने मी खासदार आहे म्हणालात. यावरुन ते तुमची खिल्ली उडवू शकतात," असे जयराम रमेश त्यावेली म्हणाले. यानंतर राहुल यांनी आपली चुक सुधारली आणि आपला मुद्दा पुढे सुरू ठेवला.

Web Title: 'Dear Rahul Gandhi, your wish has been fulfilled...', BJP's criticism from 'that' statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.