मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:28 AM2024-04-26T10:28:34+5:302024-04-26T10:34:38+5:30

लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

darbhanga house caught fire due to fireworks during wedding procession six people dead | मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू

फोटो - आजतक

बिहारमधील दरभंगा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर ब्लॉकमधील अंटोर गावात ही घटना घडली. गावात लग्नसमारंभ होता. यावेळी लोक लग्नात फटाके फोडत होते. याच दरम्यान, फटाक्यांच्या ठिणगीमुळे घराला आग लागली. काही वेळातच आग इतकी पसरली की ती विझवणे कठीण झाले.

आग घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचली आणि काही वेळाने सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या ड्रमलाही आग लागली. काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.

सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. 
 

Web Title: darbhanga house caught fire due to fireworks during wedding procession six people dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.