CoronaVirus : भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढवली चिंता, तीन राज्यांत आढळले 25 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:34 AM2021-06-22T09:34:23+5:302021-06-22T09:36:54+5:30

CoronaVirus : महाराष्ट्रात 15 मेपासून आतापर्यंत 7500 नमुने घेण्यात आले आहेत, त्यात डेल्टा प्लसची सुमारे 21 प्रकरणे आढळली आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

CoronaVirus: coronavirus in india delta plus variant cases of covid-19 in india | CoronaVirus : भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढवली चिंता, तीन राज्यांत आढळले 25 रुग्ण

CoronaVirus : भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढवली चिंता, तीन राज्यांत आढळले 25 रुग्ण

Next

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus In India) दुसरी लाट कमी होत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta+ Variant) चेही प्रकरण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी नऊ जळगाव, सात मुंबई व सिंधुदुर्ग, ठाणे व पालगड जिल्ह्यातील प्रत्येकी एक आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. 
तसेच, महाराष्ट्र सरकारने जीनोम सिक्वेंसिंग करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. CSIR आणि IGIB च्या नमुन्याच्या नेतृत्वात सॅम्पलिंग केले जात आहे. 15 मेपासून आतापर्यंत 7500 नमुने घेण्यात आले आहेत, त्यात डेल्टा प्लसची सुमारे 21 प्रकरणे आढळली आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

दुसरीकडे, केरळच्या दोन जिल्ह्यांमध्ये पलक्कड आणि पथनमथिट्टा या दोन जिल्ह्यातून गोळा झालेल्या नमुन्यांमध्ये सॉर्स-सीओव्ही -2 डेल्टा प्लसची किमान तीन प्रकरणे सापडली आहेत. सोमवारी येथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पथनमथिट्टामधील जिल्हाधिकारी डॉ. नरसिंहगुरी टी.एल. रेड्डी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कडापारा पंचायत येथील चार वर्षाच्या मुलाला कोरोना व्हायरच्या नवीन डेल्टा-प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे आढळले.

CSIR-IGIB मध्ये घेण्यात आलेल्या मुलाच्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेंसिंगद्वारे नवीन व्हेरिएंट समजून आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यातील बाधित भागात कठोर उपाययोजना केल्या आहेत. गेल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल म्हणाले होते की, नव्याने सापडलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटला अद्याप चिंताजनक व्हेरिएंट म्हणून वर्गीकृत केलेले नाही.

Delta+ Variant चे पहिले प्रकरण मध्य प्रदेशात
भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे पहिले प्रकरण मध्य प्रदेशात आढळले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका 65 वर्षीय महिलेमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लक्षणे आढळली. ही महिला होम आयसोलेशनमध्येच कोरोनातून बरी झाली. तसेच, तिला कोरोना लसीचे दोन डोसही देण्यात आले होते. 23 मे रोजी तिचे नमुने घेण्यात आले होते आणि 16 जून रोजी नॅशनल सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) च्या अहवालात म्हटले आहे की, तिला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. हिंदी वृत्तपत्र हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, राज्यातील शिवपुरी जिल्ह्यात चार जण डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संक्रमित आढळले होते. वृत्तामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या चौघांनाही लस देण्यात आली होती आणि त्यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला.

Read in English

Web Title: CoronaVirus: coronavirus in india delta plus variant cases of covid-19 in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.