छत्तीसगड: काॅंग्रेस-भाजपला समान संधी, यंदा काेणाला साथ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:16 AM2024-05-05T06:16:49+5:302024-05-05T06:17:07+5:30

छत्तीसगड राज्यातली ही हॅाट सीट असून आतापर्यंत काँग्रेसला १० वेळा विजय मिळाला असून सहा वेळा दुर्गवासीयांनी भाजपला साथ दिली आहे.

Chhattisgarh: Equal opportunity for Congress-BJP, who will support this year? | छत्तीसगड: काॅंग्रेस-भाजपला समान संधी, यंदा काेणाला साथ?

छत्तीसगड: काॅंग्रेस-भाजपला समान संधी, यंदा काेणाला साथ?

- गजानन चोपडे
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्ग : भिलाई इस्पात कारखान्यामुळे सबंध आशिया खंडात ओळखल्या जाणाऱ्या दुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले विजय बघेल यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर एकूण लोकसंख्येच्या ५३ टक्के असलेल्या साहू आणि कुर्मी समाजाच्या मतांवर डोळा ठेवत काँग्रेसने राजेंद्र साहू यांना मैदानात उतरविले आहे.

छत्तीसगड राज्यातली ही हॅाट सीट असून आतापर्यंत काँग्रेसला १० वेळा विजय मिळाला असून सहा वेळा दुर्गवासीयांनी भाजपला साथ दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ताम्रध्वज साहू यांनी भाजप उमेदवार सरोज पांडेय यांना पराभूत केले होते. त्यामुळे काँग्रेसने राजेंद्र साहू यांच्यावर डाव लावला आहे. एकंदरीत ही लढत अतिशय रंजक होत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
भिलाई इस्पात कारखान्याचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप विरोधकांचा आहे
रोजगार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा येथेही गाजत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष याच मुद्याला हात घालताना दिसतात.
विधानसभा निवडणुकीत दुर्गच्या नऊ मतदारसंघांपैकी सात जागांवर भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे लोकसभेतही जनतेचे प्रेम मिळेल, असे भाजप नेत्यांना वाटते.


२०१९ मध्ये काय घडले?
विजय बघेल
भाजप (विजयी)
८,४९,३७४ 
प्रतिमा चंद्रकार
 काॅंग्रेस
४,५७,३९६

Web Title: Chhattisgarh: Equal opportunity for Congress-BJP, who will support this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :durg-pcदुर्ग