खळबळजनक! बॅरियर तोडून घेतला यू-टर्न... टोल प्लाझा गार्डला कारने चिरडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 05:30 PM2023-08-06T17:30:47+5:302023-08-06T17:31:58+5:30

टोल प्लाझा येथे एका कार चालकाने बॅरियर तोडून टोल प्लाझा कर्मचाऱ्याला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला.

car broke the barrier and hit the toll plaza worker at chijarsi toll plaza in hapur | खळबळजनक! बॅरियर तोडून घेतला यू-टर्न... टोल प्लाझा गार्डला कारने चिरडण्याचा प्रयत्न

फोटो - आजतक

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील हापूर येथील छिजारसी टोल प्लाझा येथे तैनात असलेल्या टोल कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅरियर तोडल्यानंतर कार चालकाने टोल कर्मचाऱ्याला गाडीने धडक दिली आणि नंतर त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याचवेळी आरोपी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. ही संपूर्ण घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हापूरच्या छिजारसी टोल प्लाझा येथे एका कार चालकाने बॅरियर तोडून टोल प्लाझा कर्मचाऱ्याला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. पांढऱ्या रंगाची कार बॅरियर तोडून आत शिरते आणि नंतर अचानक यू-टर्न घेत टोल प्लाझाच्या गार्डला धडकते, असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाडीने धडक दिल्याने गार्ड रस्त्यावर पडतो. यानंतर कार चालक गार्डला चिरडण्याचा प्रयत्न करतो. 

ही घटना पाहताच प्लाझावर उपस्थित असलेल्या लोकांनी गार्डला वाचवण्यासाठी धाव घेतली. या घटनेत गार्ड गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी आरोपी कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणाची माहिती पिलखुवा कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

पिलखुवा कोतवाली सीओ वरुण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ही घटना घडली. छिजारसी टोल प्लाझा येथे सुरक्षारक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार चालकाची ओळख पटवली जात आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: car broke the barrier and hit the toll plaza worker at chijarsi toll plaza in hapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.