India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:00 PM2024-05-10T21:00:41+5:302024-05-10T21:02:04+5:30

Tejasvi Surya on Mani Shankar Iyer, India vs Pakistan: पाकिस्तान आमच्या देशात दहशतवादी पाठवतो याचा विसर काँग्रेसला विसर पडतो, अशी टीकाही तेजस्वी सूर्या यांनी केली.

BJP Tejasvi Surya slams Congress Manishankar Iyer If Pakistan has Nuclear Bomb then India has PM narendra Modi amid Lok Sabha Election 2024 | India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला

India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला

Tejasvi Surya on Mani Shankar Iyer, India vs Pakistan: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या उत्तर प्रदेशात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तेजस्वी सूर्या हे भाजपचे आक्रमक नेते मानले जातात. उत्तर प्रदेशातील त्यांच्या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा काही काळापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात मणिशंकर अय्यर पाकिस्तानबाबत भाष्य करताना दिसले. याच मुद्द्यावरून तेजस्वी सूर्या यांनी अय्यर यांच्यावर टीकास्त्र सोडले.

शेजारील देशांकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे. जर भारत पाकिस्तानचा आदर करत नसेल तर ते आपल्याविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याचा विचार करू शकतात. पाकिस्तानला नकार देणे योग्य नाही. या मुलाखती दरम्यान मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानचे समर्थन करताना दिसल्याचे सोशल मीडियावर अनेक युजर्सने म्हटले होते. त्यांच्याा या विधानावर तेजस्वी सूर्या यांनी टीव्हीनाइनशी बोलताना उत्तर दिले.

मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना तेजस्वी सूर्या म्हणाले की, "जर पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर आमच्याकडेही नरेंद्र मोदी आहेत. काँग्रेसचे पाकिस्तानप्रेम अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेसच्या वतीने अय्यर पाकिस्तानची ताकद दाखवत आहेत. अय्यर म्हणतात की पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, पण तोच पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादी पाठवतो याचा त्यांना विसर पडतो." दरम्यान, अय्यर यांच्या वक्तव्यावर तेजस्वी व्यतिरिक्त भाजपच्या इतरही अनेक नेत्यांनी प्रतिहल्ला चढवला आहे.

Web Title: BJP Tejasvi Surya slams Congress Manishankar Iyer If Pakistan has Nuclear Bomb then India has PM narendra Modi amid Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.