Devashish Jararia : "माझं भविष्य उद्ध्वस्त केलं..."; तिकीट न मिळाल्याने देवाशीष जरारिया यांनी सोडली काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 01:36 PM2024-04-17T13:36:19+5:302024-04-17T13:44:15+5:30

Devashish Jararia And Congress : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देवाशीष जरारिया यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

bhind lok sabha election 2024 candidate devashish jararia resigned from congress | Devashish Jararia : "माझं भविष्य उद्ध्वस्त केलं..."; तिकीट न मिळाल्याने देवाशीष जरारिया यांनी सोडली काँग्रेस

Devashish Jararia : "माझं भविष्य उद्ध्वस्त केलं..."; तिकीट न मिळाल्याने देवाशीष जरारिया यांनी सोडली काँग्रेस

मध्य प्रदेशातील भिंडमधून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभा उमेदवार असलेले देवाशीष जरारिया यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या तरुण नेत्याने आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला आहे.

देवाशीष जरारिया म्हणाले की, "माझं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. मला दिल्लीहून इथे आणलं. मी दिल्लीत कायद्याचं चांगलं शिक्षण घेत होतो. मला इथे आणले आणि 5 वर्षे इथे काम करायला सांगितलं. माझं तिकीट कापलं. संघटनेतही मला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. आमच्याच समाजातील निशा बागरे यांचं भवितव्यही काँग्रेसने उद्ध्वस्त केलं."

"मला इतर ठिकाणांहून ऑफर आहेत. याबाबत मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे." आजतकशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "2019 मध्ये पक्षाने मला उमेदवारी दिली होती, पराभवानंतरही परिसरातील लोकांमध्ये राहिलो आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम केलं. या काळात अनेक निवडणुका झाल्या आणि लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याचं आश्वासन पक्षाकडून देण्यात आलं, मात्र लोकसभा निवडणुकीत तिकीट कापलं."

"संघटनेत जबाबदारी देण्याची चर्चा होती, मात्र ती जबाबदारीही देण्यात आलेली नाही. एवढेच नाही तर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराकडून त्यांना कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जात नाही. आपल्या राजकीय हत्येची जबाबदारी काँग्रेसमधील नेत्यांनी घेतली असून मला दुधातल्या माशीप्रमाणे काढून फेकून दिलं आहे" असं देवाशीष यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: bhind lok sabha election 2024 candidate devashish jararia resigned from congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.