बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 01:34 PM2024-04-30T13:34:46+5:302024-04-30T14:25:55+5:30

Lok Sabha Election 2024: काँग्रेसची हताशा आणि नैराश्य इथपर्यंत पोहोचलंय की त्यांनी माझा आणि काही भाजपा नेत्यांचा बनावट व्हिडीओ बनवून सार्वजनिकपणे फॉरवर्ड करण्याचं काम केलं आहे. सुदैवाने मी जे काही बोललो होतो, त्याचं चित्रिकरण उपलब्ध होतं. त्यामुळे खरं खोटं लगेच उघडकीस आलं, असा टोला अमित शाह यांनी काँग्रेला लगावला.

Amit Shah's reply to Congress for making fake video viral, said... | बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, अमित शाहांचा आरक्षणाबाबतचा एक बनावट व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ काँग्रेसने व्हायरल केल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

आसाममधील गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, काँग्रेस खोटं बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा एसटी, एसटी आणि ओबीसींना देण्यात आलेल्या आरक्षणाची समर्थक आणि नेहमी त्याच्या संरक्षकाची भूमिका बजावेल. नरेंद्र मोदी यांनीही ही गोष्ट वारंवार सांगितली आहे. तसेच जर एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्या पक्षाने दरोडा घातला असले तर त्या पक्षाचं नाव काँग्रेस आहे, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला आहे.

काँग्रेसची हताशा आणि नैराश्य इथपर्यंत पोहोचलंय की त्यांनी माझा आणि काही भाजपा नेत्यांचा बनावट व्हिडीओ बनवून सार्वजनिकपणे फॉरवर्ड करण्याचं काम केलं आहे. सुदैवाने मी जे काही बोललो होतो, त्याचं चित्रिकरण उपलब्ध होतं. त्यामुळे खरं खोटं लगेच उघडकीस आलं. जेव्हापासून राहुल गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं आहे, तेव्हापासून राजकारणाची पातळी खालावण्याचं काम ते करत आहेत. लोकसभेत चर्चा होऊ न देणं, राज्यसभेमध्ये बहिष्कार करणं, गोंधळ घालणं, खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण ही काम त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच बनावट व्हिडीओ प्रसारित करून लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हा निंदाजनक आहे. तसेच आतापर्यंत भारतीय राजकारणामध्ये कुठल्याही प्रमुश पक्षानं असं केलंलं नव्हतं.

अमित शाह पुढे म्हणाले की, आम्ही बहुमताचा वापर कलम ३७० हटवण्यासाठी केला, कोरोनाविरोधात लढण्यासाठी केला. इंग्रजांच्या काळातील कायदे बदलून भारतीय पद्धतीचे कायदे लागू करण्यासाठी केला. ट्रिपल तलाक संपुष्टात आणण्यासाठी केला. तसेच न्यायालयाकडून आदेश मिळताच राम मंदिर बनवण्यासाठी आमच्या सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली, असेही अमित शाह म्हणाले. 

Web Title: Amit Shah's reply to Congress for making fake video viral, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.