Airplane: जायचे होते बिहारला, पोहोचले राजस्थानला, इंडिगो एअरलाइन्सकडून प्रकार; चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:01 AM2023-02-04T07:01:14+5:302023-02-04T07:01:32+5:30

Airplane:

Airplane: Wanted to go to Bihar, reached Rajasthan, sort by Indigo Airlines; There will be an inquiry | Airplane: जायचे होते बिहारला, पोहोचले राजस्थानला, इंडिगो एअरलाइन्सकडून प्रकार; चौकशी होणार

Airplane: जायचे होते बिहारला, पोहोचले राजस्थानला, इंडिगो एअरलाइन्सकडून प्रकार; चौकशी होणार

googlenewsNext

नवी दिल्ली :  इंडिगो एअरलाइन्सने बिहारला जाणाऱ्या एका प्रवाशाला राजस्थानला पोहोचवले. उदयपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवाशाच्या लक्षात आले की, विमान कंपनीने त्याला चुकीच्या विमानात बसवले आहे. हे प्रकरण ३० डिसेंबरचे आहे, त्यानंतर इंडिगोने ३१ जानेवारीला प्रवाशाला पाटण्याला पाठवले. इंडिगोचे म्हणणे आहे की प्रवासी चुकीच्या विमानात चढला होता. त्यावर डीजीसीएने जर तो चुकीच्या विमानात चढला, तर प्रवाशाचा बोर्डिंग पास नीट का तपासला नाही, असा सवाल केला. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने केरळमधील कालिकतसाठी उड्डाण केले होते. उड्डाणादरम्यान, त्याच्या उड्डाण व्यवस्थापन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाला हा दोष लक्षात आला नाही. मात्र, नंतर आगीची माहिती मिळाल्यानंतर विमान परत अबुधाबीला सुखरूप 
उतरवण्यात आले.

स्पाइसजेट कर्मचारी-प्रवाशांमध्ये वादावादी
- दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार वादावादी झाली. पाटणाकडे  जाणाऱ्या विमानाचे प्रवासी दोन तास उशीर झाल्यामुळे नाराज झाले आणि त्यातून कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. 
- एका प्रवाशाने सांगितले की, शुक्रवारी स्पाइसजेटचे दिल्ली-पाटणा विमान दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वरून सकाळी ७.२० वा. निघणार होते. 
- परंतु ते सकाळी १०.१० वाजता निघाले. डीजीसीएने पाटणाऐवजी उदयपूरच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांना बसवल्याच्या प्रकरणाची दखल घेतली आहे.

१ हजार फूट उंचीवर विमानाच्या इंजिनला आग
केरळच्या कोझिकोडला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी पहाटे अबुधाबी विमानतळावर उड्डाणाच्या वेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने परतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या घटनेची चौकशी करणार आहे.
डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उड्डाणाच्या वेळी विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बोइंग ७३७-८०० विमानात एकूण १८४ प्रवासी होते आणि ते सर्व सुरक्षित आहेत. विमानाचे एक इंजिन निकामी झाले होते.
अबुधाबीहून कोझिकोडला जाणारे सदर विमान सुमारे १००० फूट उंचीवर असताना इंजिन क्रमांक एकला आग लागल्याने परत गेले. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदन जारी केले असून त्यात विमानाच्या एका इंजिनमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर विमान अबुधाबी विमानतळावर सुरक्षितपणे परत आले.
 

Web Title: Airplane: Wanted to go to Bihar, reached Rajasthan, sort by Indigo Airlines; There will be an inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.