हिंदू मुलीचे अपहरण करून केले धर्मांतर, जबरदस्तीने लावले लग्न; मौलवीसह 10 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:14 PM2022-12-09T18:14:26+5:302022-12-09T18:17:45+5:30

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धर्मांतराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

A case has been registered against 10 people, including a cleric, who abducted Hindu girl and converted them in Uttar Pradesh Fatehpur district | हिंदू मुलीचे अपहरण करून केले धर्मांतर, जबरदस्तीने लावले लग्न; मौलवीसह 10 जणांवर गुन्हा दाखल

हिंदू मुलीचे अपहरण करून केले धर्मांतर, जबरदस्तीने लावले लग्न; मौलवीसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Next

फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात धर्मांतराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आठ महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीचे धर्मांतर केल्यानंतर तिचे बळजबरीने लग्न लावण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच मुलीच्या आईने घटनास्थळ गाठले, बळजबरीने सुरू असलेल्या लग्नाला मुलीच्या आईने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. याशिवाय त्यांनी तिचे कपडे फाडले. घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मौलवीसह दोन जणांना ताब्यात घेतले. 

या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मौलवी कल्लू यासह 10 जणांविरुद्ध अपहरण, धर्मांतर, मारहाण, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी आणि देशद्रोह या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. खरं तर ही घटना असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातोपीत गावातील आहे. कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील हरिहरगंज येथील रहिवासी मानसी गुप्ता ही तरूणी 8 मे 2022 रोजी संशयास्पद स्थितीत बेपत्ता झाली होती. या प्रकरणी आई अंजुला गुप्ता यांनी कोतवाली येथे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
 
लग्नाला विरोध केल्याने दिली जीवे मारण्याची धमकी
माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी मुलीच्या आईला समजले की आरोपी अन्सार अहमद हा तिच्या मुलीचे असोथर पोलीस स्टेशन हद्दीतील सातो गावात जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न करत आहे. त्यानंतर मुलीची आई सातो या गावात पोहोचली. तिथे मौलवी लग्न लावत असल्याचे मुलीच्या आईने पाहिले. तिने लग्नाला विरोध केला असता आरोपीने तिला बेदम मारहाण करून तिचे कपडे फाडले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मौलवीसह दोघांना अटक केली.

विविध कलमांखाली घेतलं ताब्यात 
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून असोथर पोलिसांनी आरोपी अन्सार अहमद, त्याची आई साहरुन निशा, भाऊ नौशाद अली, दिलशाद अली, मेहुणी सोनी बानो, यास्मीन, बहीण तहरुण निशा आणि मौलवी कल्लू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध आयपीसीच्या कलम 147, 323, 504, 506, 366, 354 आणि उत्तर प्रदेश कायदा 2021 च्या कलम 3, 5 (1) अन्वये गुन्हा दाखल केला. लक्षणीय बाब म्हणजे मुख्य आरोपी अन्सार अहमद आणि मौलवी कल्लूला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील 8 आरोपी अद्याप फरार आहेत.

मुलीला आमिष दाखवून केले अपहरण 
सीओ थारियाव दिनेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, असोथर पोलीस स्टेशन परिसरात मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर मुख्य आरोपी अन्सार अहमद आणि मौलवी कल्लू यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: A case has been registered against 10 people, including a cleric, who abducted Hindu girl and converted them in Uttar Pradesh Fatehpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.