बालविवाह करणारे १,८०० जण तुरुंगात, या राज्यात धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:12 AM2023-02-04T07:12:02+5:302023-02-04T07:12:34+5:30

Assam: आसाममध्ये बालविवाहाविरूद्ध शुक्रवारी सकाळपासून राज्यव्यापी धडक मोहीम सुरू असून, आतापर्यंत १,८०० जणांना अटक करण्यात आली आहे

1,800 people who committed child marriage in jail, drastic action in Assam | बालविवाह करणारे १,८०० जण तुरुंगात, या राज्यात धडक कारवाई

बालविवाह करणारे १,८०० जण तुरुंगात, या राज्यात धडक कारवाई

googlenewsNext

गुवाहाटी : आसाममध्ये बालविवाहाविरूद्ध शुक्रवारी सकाळपासून राज्यव्यापी धडक मोहीम सुरू असून, आतापर्यंत १,८०० जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी दिली. पुढील तीन ते चार दिवस ही मोहीम सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. येथे एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. 
बालविवाहाच्या समस्येला आळा घालण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यासह अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २३ जानेवारीच्या बैठकीत घेतला होता. यानंतर  पंधरा दिवसांहून कमी कालावधीत पोलिसांनी बालविवाहाच्या ४,००४ गुन्ह्यांची नोंद केली. धुबरी येथून आतापर्यंत सर्वाधिक १३६ जणांना अटक करण्यात आली असून, तेथे सर्वाधिक ३७० गुन्हे दाखल आहेत. बारपेटा येथे ११० आणि नागावमध्ये १०० जणांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: 1,800 people who committed child marriage in jail, drastic action in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.