येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 08:39 PM2022-02-27T20:39:06+5:302022-02-27T20:42:08+5:30

येवला : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ५६ वी पुण्यतिथी परशुराम प्रतिष्ठान व ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

Swatantryaveer Savarkar Punyatithi in Yeola | येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी

येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी

googlenewsNext
ठळक मुद्देभारतरत्न सावरकर हेच विशेषण लावू, असा निर्धार केल्याची घोषणा दिली.

येवला : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ५६ वी पुण्यतिथी परशुराम प्रतिष्ठान व ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

प्रारंभी वीर सावरकर यांना अभिवादन करून प्रतिमापूजन करण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना रेल्वे खात्याला दुरांतो एक्स्प्रेसचे वीर सावरकर एक्स्प्रेस असं नामांतर करण्याची मागणी केली. ब्राह्मण महासंघाचा प्रदेश महिला कार्यध्यक्ष स्मिता कुलकर्णी यांनी सरकारने सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले नाही तरी आम्ही त्यांना भारतरत्न सावरकर हेच विशेषण लावू, असा निर्धार केल्याची घोषणा दिली.
वीर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद शिंदे, परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सदस्य राम कुलकर्णी यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास यशस्वितेसाठी स्वाती सावरगावकर, श्रीपाद जोशी, पराग पाटील, विशाल शिखरे, श्रीरंग सावरगावकर, प्रसाद गुब्बी, प्रणव दीक्षित, प्रथमेश कुलकर्णी, विद्या धर्माधिकारी, अक्षय कुलकर्णी, मनीषा कुलकर्णी, शलाका कुलकर्णी, ज्योत्स्ना कुलकर्णी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Swatantryaveer Savarkar Punyatithi in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.