आसखेडा येथे वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 08:47 PM2022-02-27T20:47:17+5:302022-02-27T20:48:01+5:30

नामपूर : आसखेडा, ता. बागलाण येथे महावितरण कंपनीवर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देऊनही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रविवारी (दि.२७) सकाळी उत्राणे शिवारातील व द्याने येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपकेंद्रावर धाव घेतली. यावेळी अधिकारी हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी नामपूर-ताहाराबाद रस्त्यावर आंदोलन करत वाहतूक जाम करून टाकली.

Power outage at Askheda Block the way of farmers | आसखेडा येथे वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

आसखेडा, ता. बागलाण येथील वीजप्रश्नी शेतकऱ्यांनी नामपूर-ताहाराबाद रस्त्यावर मांडलेला ठिय्या.

Next
ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : निवेदन देऊनही दखल नाही

नामपूर : आसखेडा, ता. बागलाण येथे महावितरण कंपनीवर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देऊनही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रविवारी (दि.२७) सकाळी उत्राणे शिवारातील व द्याने येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपकेंद्रावर धाव घेतली. यावेळी अधिकारी हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी नामपूर-ताहाराबाद रस्त्यावर आंदोलन करत वाहतूक जाम करून टाकली.
द्याने व उत्राने येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदन कार्यकारी अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते. आसखेडा येथील कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही डीपीवर लोड जास्त असल्याकारणाने रोहित्र ट्रिप होतात असेच सांगितले जायचे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र उपकेंद्रावर वेळेवर अधिकारी हजर न झाल्या कारणाने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना नामपूर ते ताराबाद रस्त्यावर आंदोलन करावे लागले. त्यामुळे रस्ता बंद होऊन ट्रॅफिक जाम झाली होती.
यावेळी जायखेडा पोलीस स्टेशन येथील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. त्यानंतर महावितरण कंपनीचे संपूर्ण अधिकारी त्या जागेवर तत्काळ उपस्थित झाले. आंदोलनास उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार, अभिमान पगार, शरद पगारे, संदीप कापडणीस यांनी कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून काही लोड नामपूर सबस्टेशनवर टाकतो असे सांगितले. त्यानंतर आंदोलनाला पूर्ण विराम देण्यात आला.

Web Title: Power outage at Askheda Block the way of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.