पती-पत्नी एकत्रीकरणासाठी चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:44 PM2018-07-11T16:44:15+5:302018-07-11T16:52:06+5:30

nashik,zp,false,information,husbandwife,gathering | पती-पत्नी एकत्रीकरणासाठी चुकीची माहिती

पती-पत्नी एकत्रीकरणासाठी चुकीची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देबदलीप्रकरण : चुकीचे अंतर दाखवून केली शासनाची फसवणूक१४ तालुक्यांमधून १७ जणांनी दिलेले प्रमाणपत्र संशयास्पद

नाशिक: शिक्षक बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरतांना शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीस्कर बदली पदरात पाडून घेतल्याप्रकरणी अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याने जिल्हा परिषदेने अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून पत्नी-पत्नी एकत्रीकरणात १०७ शिक्षकांनी खोटी माहिती नमूद केल्याची बाब समोर आली आहे. पडताळणी अद्यापही सुरू असल्याने खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिक्षकांच्या बदल्यांसाठी संवर्ग-१ आणि संवर्ग-२ असे वर्ग करण्यात आले होते. संवर्ग एक मध्ये अपंगासह बदलीचे अन्य कारणे तसेच संवर्ग-२ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचे कारण नमूद करणे अपेक्षित होते. मात्र शिक्षकांनी अर्ज दाखल करतांना अपंगांचे बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा तसेच एकत्रीकरणासाठी ३० किलोमीटरच्या आतीलही शिक्षकांनी अर्ज केल्याचा आरोप काही शिक्षकांनीच केल्याने बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
आजवर झालेल्या पडताळणीत सर्वाधिक गोंधळ पती-पत्नी एकत्रीकरणात चुकीची माहिती भरल्याची बाब समोर आली आहे. आॅनलाईन बदली प्रक्रि येत संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणात चुकीचे अंतर दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. संवर्ग दोन प्रमाणेच संवर्ग एकमध्ये देखील १४ तालुक्यांमधून १७ जणांनी दिलेले प्रमाणपत्र संशयास्पद असल्याने त्यांची दुसºयाटप्प्यात सखोल चौकशी केली जाणार आहे.

Web Title: nashik,zp,false,information,husbandwife,gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.