इगतपुरी-त्र्यंबकेश्वर : चौरंगी वाटणारी लढत खऱ्या अर्थाने दुरंगी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:46 AM2019-10-08T01:46:18+5:302019-10-08T01:46:47+5:30
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात चौरंगी असूनही दुरंगी लढतीचे स्पष्ट चित्र आहे. गेल्या वेळी १२ उमेदवार लढतीत सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजप आदी पक्षांनी लढत दिली होती. यामध्ये निर्मला गावित यांनी दुसऱ्यांदा यश मिळवले होते.
घोटी : इगतपुरी - त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात चौरंगी असूनही दुरंगी लढतीचे स्पष्ट चित्र आहे.
गेल्या वेळी १२ उमेदवार लढतीत सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजप आदी पक्षांनी लढत दिली होती. यामध्ये निर्मला गावित यांनी दुसऱ्यांदा यश मिळवले होते. यावेळी काँग्रेसमधून पक्षांतर करून शिवसेनेत दाखल होऊन गावित तिसºयांदा विजयासाठी सरसावल्या आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार यंदा पक्षांतराच्या दणक्यामुळे रिंगणात नसले तरी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
शिवसेना उमेदवार तथा विद्यमान आमदार निर्मला गावित, काँग्रेस महाआघाडीचे हिरामण खोसकर, मनसेचे योगेश शेवरे, वंचित बहुजन आघाडीचे लकी ऊर्फ लक्ष्मण जाधव या उमेदवारांत खरा लढा होणार असल्याचे स्पष्ट झाले. या मतदारसंघात कोणत्याही पक्षात बंडखोरी झाली नसल्याने याचा फायदा कोण घेणार याकडे लक्ष आहे.
पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार यंदा रिंगणात नाही. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत भूमिकेकडे सर्वांची नजर आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण मतदार २ लाख ५९ हजार ३६६ असून, विधानसभेत प्रतिनिधित्वासाठी निकराचा लढा होणार आहे.
रिंगणातील उमेदवार...
निर्मला गावित (शिवसेना), हिरामण खोसकर (इंदिरा काँग्रेस), योगेश शेवरे (मनसे), लकी ऊर्फ लक्ष्मण जाधव (वंचित बहुजन आघाडी), शिवराम खाने (भारतीय ट्रायबल पार्टी), दत्तात्रय नारळे (अपक्ष), यशवंत पारधी (अपक्ष), विकास शेंगाळ, (अपक्ष), शैला झोले (अपक्ष).