पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:29 PM2024-05-08T18:29:57+5:302024-05-08T18:30:49+5:30

Chhagan Bhujbal : गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत. मात्र यापूर्वी असे प्रकार घडले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

I want the Pawar family to come together once again - Chhagan Bhujbal | पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ

पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ

नाशिक :  बारामतीची निवडणूक होऊन एकदाची होऊन गेली, याचा आमच्या सारख्याला आनंद आहे. कारण, पवार कुटुंबात निवडणुकीवरुन आरोप - प्रत्यारोपांचे कलगीतुरे रंगले होते. हे काही आनंददायी चित्र नव्हते. पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा आहेच. आपण राजकीय जरी म्हटलं तरी कुटुंबावर परिणाम होतात, असे मत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. नाशिकमधील येवला दौऱ्यावर होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

बारामतीत मतदान कमी झाले, यावर माध्यमांनी पाहावे. पवार कुटुंबात निवडणूक झाली, याची तुम्हाला खंत वाटते. कुटुंबातील लोकांवरच वार-प्रतिवार झाले, याबद्दल नक्कीच मला खंत आहे. गेली 30 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे. यापूर्वीही पवार कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांविरोधात लढाई झालेली आहे. गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत. मात्र यापूर्वी असे प्रकार घडले नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

याचबरोबर, अजितदादांच्या ऑक्टोबरमधील शपधविधीची कल्पना मलाच नव्हती, उलट मी आणि समीर भुजबळांनी पळून गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करीत आहे, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच,  2004 मध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळू शकले असते. मात्र, त्यावेळची संधी शरद पवारांनी कशामुळे गमावली, हे अजूनही गुढ आहे. त्याबद्दल आम्ही पवार साहेबांना विचारले, पण त्यांनी उत्तर देण्याचे टाळले, असे छगन भुजबळ म्हणाले.

Web Title: I want the Pawar family to come together once again - Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.