रुग्णवाहिका चालकाला शासनाचा ' जीवनदूत ' पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:07 PM2021-02-18T23:07:30+5:302021-02-19T01:53:42+5:30
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या वतीने ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोंदे दुमाला येथील जगत्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'जीवनदूत' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.