कोरोना काळात तरु णांनी जोपसली वाचनाची आवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 09:09 PM2020-10-15T21:09:26+5:302020-10-16T01:53:58+5:30
देवगाव : वाचनात खंड पडलेल्या आणि काही कारणास्तव एखादे पुस्तक वाचायला न मिळालेल्या तरु णांनी आपली वाचनाची आवड जोपसली तर अनेक वाचकांनी वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे आॅनलाइन वाचन लॉकडाऊनच्या कालावधीत तयुणाईने केल्याचे दिसून आले.
देवगाव : वाचनात खंड पडलेल्या आणि काही कारणास्तव एखादे पुस्तक वाचायला न मिळालेल्या तरु णांनी आपली वाचनाची आवड जोपसली तर अनेक वाचकांनी वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे आॅनलाइन वाचन लॉकडाऊनच्या कालावधीत तयुणाईने केल्याचे दिसून आले.
विविध कथासंग्रह, काव्यसंग्रह, ललित साहित्य, प्रवासवर्णन आत्मचरित्र, कादंबरी आदी पुस्तकांचे वाचन केल्याचे ग्रामीण भागातील तरु णांनी केले. तरु णपिढीने विविध अॅप डाउनलोड करून आॅनलाईन कथांचेदेखील वाचन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले आणि या काळात बाहेर पडण्यावर बंदी घातली गेली. वाचनालये बंद झाल्याने पुस्तकांची देवाणघेवाण थांबली. या काळातील रिकाम्या वेळेचा पुरेपूर वापर वाचकांनी केला. काही वाचकांनी संग्रहित असलेली पुस्तके पुन्हा वाचली. तर काहींनी संग्रहात असलेली परंतु वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे वाचन केले. ज्यांना धावपळीत व कामाच्या व्यस्त शेड्युलमध्ये कादंबरी वाचणे शक्य नव्हते त्यांनी देखील या दिवसांत कादंबर्या वाचून काढल्या. कवितासंग्रहाचेही भरपूर प्रमाणात वाचन झाले. नव्याने वाचणार्यांनी आवडत्या लेखकापासून ते गाजलेल्या पुस्तकांचे वाचन केले. वाचनप्रेमींनी कथांचे वाचन केले. ई-बुक्स देखील वाचली. काहींनी आवडीनुसार एकांकिकेचे वाचन देखील केले.
लॉकडाऊनकाळात पुस्तकांची मोलाची साथ लाभली. अनेक कथासंग्रह, कादंबरी, प्रवास वर्णने वाचनात आली.जगण्याचा मार्ग, अण्णा भाऊ साठेंच समग्र वाड्मय, संविधान, कोल्हाट्याचं पोरं, उपरा, बलुत, मन में है विश्वास, थ्री मिस्टिक्स आॅफ माय लाईफ आदी दर्जेदार पुस्तके वाचली. मी ग्रंथालयशास्त्राची पदवी घेतल्यामुळे माझ्याा घरात माझं स्वत:च छोटंसं ग्रंथालय आहे.
- योगिता रोकडे, वाचनप्रेमी