रस्ता सुरक्षा अभियानातर्गत अभिनव शाळेतर्फे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:19 PM2020-01-18T12:19:08+5:302020-01-18T12:25:04+5:30
रस्ता सुरक्षा अभियानातर्गत लोकांमध्ये रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी व वाहने चालवितांना काळजी कशी घ्यावी यासाठी जनजागृती व्हावी म्हणून रॅलीचे आयोजन
नाशिक : अभिनव बालविकास मंदिर, उत्तमनगर शाळेत रस्ता सुरक्षा अभियानातर्गत लोकांमध्ये रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी व वाहने चालवितांना काळजी कशी घ्यावी यासाठी जनजागृती व्हावी म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका शोभा गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ता वाहतूक सुरक्षेसंदर्भात घोषवाक्य वापरून जनजागृती केली. यात हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे तसेच त्यामुळे होणारे फायदे सांगण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालून हेल्मेटचे महत्व पटवून दिले व विविध ठिकाणी पथनाटयाद्वारे रस्ता सुरक्षा संदर्भात माहिती दिली. यावेळी विलास जाधव, जितेंद्र आहेर, पंकज पवार, चेतन सूर्यवंशी, अर्चना आहेर, सुनिता वाघ, गणेश चौरे आदी उपस्थित होते.