भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:44 PM2019-10-24T16:44:19+5:302019-10-24T16:46:46+5:30

Bhokar Vidhan Sabha Election Results 2019 : Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar भोकर मतदारसंघाकडे होते राज्याचे लक्ष

Bhokar Election Results 2019: Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव 

भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव 

googlenewsNext

भोकर मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच 'किंग' ठरले आहेत. त्यांनी भाजपच्या बापूसाहेब गोरठेकर यांचा तब्बल 97 हजार 445 मतांनी पराभव केला. चव्हाण यांना 1 लाख 37 हजार 318 तर गोरठेकर यांना 41 हजार 874 मते मिळाली. २०१४ मध्ये अमिता चव्हाण यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते़ त्यानंतर लोकसभा पराभवानंतर यावेळी खुद्द अशोकराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर विरोधात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देवून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. 

भोकर मतदारसंघात १९७८ मध्ये चव्हाण आणि गोरठेकर आमनेसामने आले होते. फरक एवढाच की, आता त्यांच्या वारसांमध्ये लढत झाली. महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारा आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. प्रारंभी १९६२, १९६७, १९७२, १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण यांनी विजय मिळवित सतत २० वर्षे नेतृत्व केले होते. त्यानंतर सातत्याने हा मतदार संघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी राहिला आहे. 

असे होते २०१४ चे चित्र : 
अमिता चव्हाण (काँग्रेस-विजयी)  
माधवराव किन्हाळकर   (भाजप-पराभूत)

Web Title: Bhokar Election Results 2019: Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar, Maharashtra vidhan sabha election Results 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.