दोन मतदान अधिकाऱ्यांना उन्हामुळे आली भोवळ; मेडिकलमध्ये दाखल, प्रकृती स्थीर

By सुमेध वाघमार | Published: April 18, 2024 07:35 PM2024-04-18T19:35:29+5:302024-04-18T19:35:38+5:30

कुर्वेज न्यू मॉडेल स्कूल मतदान केंद्रावरील प्रकार

Two polling officers suffered from heatstroke | दोन मतदान अधिकाऱ्यांना उन्हामुळे आली भोवळ; मेडिकलमध्ये दाखल, प्रकृती स्थीर

दोन मतदान अधिकाऱ्यांना उन्हामुळे आली भोवळ; मेडिकलमध्ये दाखल, प्रकृती स्थीर

नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी गुरुवारी निवडणूक मतदान अधिकारी व कर्मचारी नेमूण दिलेल्या मतदान केंद्रावर पोहचले. परंतु यातील दोघांना उन्हामुळे भोवळ आली. लागलीच त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मेडिकलमध्ये दाखल केले.

उपराजधानिचे गुरुवारचे तापमान ४१ अंशावर गेले. उन्हाची स्थिती लक्षता घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश दिले. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचाºयाला दुर्दैवाने काही गंभीर आरोग्याची समस्या निर्माण झाली तर जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ‘कॅशलेस’ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचाही सूचना महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या. आरोग्य विभागाने मेयो, मेडिकलसह काही खासगी हॉस्पिटलला ‘अलर्ट’वर ठेवले. 

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी निवडणूक मतदान अधिकारी दीक्षाभूमी येथील कु र्वेज न्यू मॉडेल स्कूल येथे कर्तव्यावर असलेल्या अनुजा वाघमारे (४२) यांना दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान उन्हामुळे अचानक भोवळ आली. त्यांना लागलीच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा दोन वेळा ईसीजी काढण्यात आला. सलाईन लावण्यात आले.

प्रकृती स्थिर झाल्यावर दुपारी ३.२० वाजता त्यांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. याच केंद्रावर कर्तव्यावर असलेले मनोज चौधरी यांनाही भोवळ आल्याने दुपारी २.१० वाजता मेडिकलमध्ये दाखल केले. इएनटी विभागाचा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. औषधोपचारानंतर त्यांना २.३० सुटी देण्यात आली.

Web Title: Two polling officers suffered from heatstroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.