धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 02:26 PM2024-05-05T14:26:43+5:302024-05-05T14:28:08+5:30

समाजाच्या तटस्थ वृत्तीमुळेच वेदना घेऊन अश्रू ढाळत जगणाऱ्या या जिवांपैकीच एक म्हणजे जोरो!

Shocking! Due to canine distemper virus' serious disease like corona, thousands of 'dogs' are at the door of death! | धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!

धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!

- सुरभी शिरपूरकर

नागपूर  : ते मुके आहेत... त्यांचे भूंकणे सर्वांनाच ऐकू येते. मात्र, त्यांची वेदना, त्या बिचाऱ्या असहाय जिवाच्या भावना कुणाला कळत नाही. त्यामुळेच की काय, अनेक जण त्यांच्यावर दगड उगारतात. काही जण लाठ्या मारतात. हिंसक वृत्तीची मंडळी त्याला लुळे लंगडे करण्यास मागेपुढे बघत नाहीत, तर स्वत:ला माणूस म्हणवून घेणारे काही क्रूर व्यक्ती त्यांच्यावर उकळते पाणी, अॅसिड फेकतात. त्यांना चक्क आपटून मारतात. लोखंडी रॉडने हल्ला चढवतात. अंगावर काटे आणणारा हा प्रकार असला तरी या बिचाऱ्या जिवांच्या रक्षणार्थ मोजके जण सोडले तर कुणी धावताना दिसत नाही. 

समाजाच्या तटस्थ वृत्तीमुळेच वेदना घेऊन अश्रू ढाळत जगणाऱ्या या जिवांपैकीच एक म्हणजे जोरो! दीड वर्षांचा जोरो सध्या एका विचित्र आजाराने त्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी एनएमसीच्या आदेशावरून त्याला उचलून नेले आणि एकाचवेळी अनेकांनी पकडून ठेवत कोणतीही प्रिकॉशन न घेता त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी अत्यंत ठणठणित, निरोगी असलेला जोरो सध्या सीडी अर्थात केनाईन डिस्टेंपर या आजाराने त्रस्त झाला आहे. ही एकट्या जोरोची करुणकथा नाही. तर त्यांच्यासारखे शेकडो जोरो सध्या या जीवघेण्या वेदना सोबत घेऊन मरणाची वाट बघत आहेत.

दरम्यान, श्वानप्रेमी असलेले अनिकेत सध्या जोरो आणि त्याच्यासारख्या अनेक श्वानांची देखभाल करीत आहेत. "गेल्या दीड वर्षांपासून मी जोरोची देखभाल करत आहे. जोरोच नाहीतर आणखी सात श्वानांची मी काळजी घेत आहे. दोन महिन्यांपूर्वी एनएमसीवाले जोरोला नसबंदीसाठी घेऊन गेले होते. त्यानंतर त्याला परत सोडले. यानंतर मला वाटले की त्याला अर्धांगवायूसंबंधी आजार आहे. त्यामुळे मी डॉक्टरकडे नेले आणि उपचार सुरु केले. त्यावेळी समजले की, केनाईन डिस्टेंपर सारखा आजार आहे. आता या आजारावर कोणतेही उपचार नाही. जोरो सारखे अनेक श्वान शहरात आहेत. जे अशा आजारामुळे त्रस्त असतील. हे सर्व एनएमसीच्या दुर्लक्षतेमुळे होत आहे", असे अनिकेत यांनी म्हटले आहे.

एबीसी अर्थातच ऍनिमल बर्थ कंट्रोलच्या अंतर्गत रस्त्यांवरून उचललेल्या श्वानांना त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी येथे असलेल्या शेल्टर होममध्ये नेण्यात येते. विशेष म्हणजे, त्या शेल्टर होम मधून परत निघालेल्या जवळपास 50 टक्के श्वानांमध्ये केनाईन डिस्टेंपर हा आजार आढळून येत आहे. या आजारात श्वानांना वेदना होतात आणि त्या कधी तर असह्य होऊन शेवटी त्यांचा मृत्यू होतो. दरम्यान, केनाईन डिस्टेम्पर या आजारावर मात करण्यासाठी व्हॅक्सिनेशन देणे अत्यंत आवश्यक आहे अतिशय कमी दरात ही व्हॅक्सीन उपलब्ध सुद्धा आहे. मात्र असे असूनही शासनामार्फत नागपूर महानगरपालिकेला केनाईन डिस्टेम्पर या आजारासाठी कुठलीही निधी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे अधिकारी सांगतात.

Web Title: Shocking! Due to canine distemper virus' serious disease like corona, thousands of 'dogs' are at the door of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.