Maharashtra Assembly Election 2019 : सुरेश साखरे यांचे रॅलीद्वारे मतदारांना साकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 10:59 PM2019-10-19T22:59:10+5:302019-10-19T22:59:32+5:30

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार, पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मतदारसंघात ...

Maharashtra Assembly Election 2019: Suresh Sakhare rally for voters | Maharashtra Assembly Election 2019 : सुरेश साखरे यांचे रॅलीद्वारे मतदारांना साकडे 

Maharashtra Assembly Election 2019 : सुरेश साखरे यांचे रॅलीद्वारे मतदारांना साकडे 

googlenewsNext

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातून बहुजन समाज पक्षाचे उमेदवार, पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मतदारसंघात भव्य रॅली काढत प्रचाराच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. क्षेत्रातील मतदारांना अभिवादन करीत त्यांनी मतांसाठी साकडे घातले.
बसपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार अ‍ॅड. वीरसिंह यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी हिरवी झेंडी दाखवत साखरे यांच्या रॅलीला रवाना केले. इंदोरा चौक येथून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख वस्त्यांमध्ये फिरत खुल्या जीपमध्ये बसलेल्या सुरेश साखरे यांनी नागरिकांना अभिवादन केले. मोटरसायकल, ई-रिक्षा आणि अनेक कारचा ताफा रॅलीसोबत चालला होता. रॅलीदरम्यान झालेल्या गर्दीने बसपा कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला आहे. यावेळी प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, जितेंद्र घोडेस्वार, प्रदेश सचिव भाऊसाहेब गोंडाणे, उत्तम शेवडे, किशोर कॅथेल, जिल्हा प्रमुख उषाताई बौद्ध, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, शहराध्यक्ष महेश सहारे, पक्षनेता वैशाली नारनवरे, माजी पक्षनेता गौतम पाटील, सभापती वीरंका भिवगडे, माजी सभापती चांदेकर, महिला नेता रंजना ढोरे, राजेश नंदेश्वर, संजय जैस्वाल, बुद्धम राऊत, नरेंद्र वालदे, योगेश लांजेवार, नितीन शिंगाडे, तपेश पाटील, रंजित सहारे, प्रताप सूर्यवंशी, विकास नागभिडे, देवेंद्र वाघमारे, मोहम्मद इब्राहिम टेलर आदी आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Suresh Sakhare rally for voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.