Maharashtra Assembly Election 2019 : उद्या मतदान उत्सुकता व दडपण : १२ जागांसाठी १४६ उमेदवार मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:04 AM2019-10-20T01:04:15+5:302019-10-20T01:05:42+5:30

विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सकुता असून, उमेदवारांवर मात्र दडपणही आले आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Eagerness and oppression of voting tomorrow: 146 candidates for 12 seats in field | Maharashtra Assembly Election 2019 : उद्या मतदान उत्सुकता व दडपण : १२ जागांसाठी १४६ उमेदवार मैदानात

Maharashtra Assembly Election 2019 : उद्या मतदान उत्सुकता व दडपण : १२ जागांसाठी १४६ उमेदवार मैदानात

Next
ठळक मुद्दे४,४१२ केंद्रांवर पार पडणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सकुता असून, उमेदवारांवर मात्र दडपणही आले आहे.
मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील १२ मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण १४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २१ ऑक्टोबर रोजी ४ हजार ४१२ मतदान केंद्रांवर ४१ लाख ७१ हजार ४२० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकाच मतदान केंद्रावर १५०० पेक्षा अधिक मतदार झाल्याने, ३० सहायक मतदान केंद्रे नव्याने केली आहेत तर इमारती जीर्ण झाल्याने, आवश्यक सुविधा नसल्याने १० ठिकाणी मतदान केंद्र बदलले आहेत. याशिवाय ४,४१२ मतदान केंद्रांपैकी ४४० मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. यामध्ये ५५ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे. शिवाय संवेदनशील मतदान केंद्रांच्या १० टक्के मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे जिल्ह्यात १२ सखी मतदान केंद्र असणार आहेत. या केंद्रात मतदान कर्मचाऱ्यांपासून तर पोलिसांपर्यंत सर्वच महिला राहतील, हे विशेष. यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारासांठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

दिव्यांग मतदारांकडून भरून घेणार‘फिड बॅक फॉर्म’
पारदर्शक, निर्भीड वातावरणनिर्मितीतून १०० टक्के मतदान व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने यंदा कंबर कसली आहे. त्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदलही केले असून, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका, अनुक्रमांकाचे स्टीकर अन् दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी मागणीनुसार वाहनांची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रांवर आवश्यक सर्व सोयीसुविधाही पुरविण्यात येईल. मतदान केंद्रांवर पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘फिड बॅक फॉर्म’ही दिव्यांग मतदारांकडून भरून घेण्यात येईल.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Eagerness and oppression of voting tomorrow: 146 candidates for 12 seats in field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.