आपल्या कार्डावर दुसऱ्यानेच रेशन घेतले तर मोबाइलवर येणार मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:12 AM2024-03-04T11:12:37+5:302024-03-04T11:14:11+5:30

शासनाने रेशनकार्डधारकांना त्यांचा मोबाइल क्रमांक कार्ड प्रणालीला जोडणे अनिर्वाय केले आहे.

someone else takes ration on ration card will receive a message on linked mobile number | आपल्या कार्डावर दुसऱ्यानेच रेशन घेतले तर मोबाइलवर येणार मेसेज

आपल्या कार्डावर दुसऱ्यानेच रेशन घेतले तर मोबाइलवर येणार मेसेज

मुंबई : शासनाने रेशनकार्डधारकांना त्यांचा मोबाइल क्रमांक कार्ड प्रणालीला जोडणे अनिर्वाय केले आहे. त्यामुळे कार्डधारकाने रेशन घेतले की त्याचा एसएमएस लिंक केलेल्या मोबाइलवर येतो. त्यामुळे आपल्या कार्डवर दुसऱ्याने रेशन घेतले तर ते कळण्यास मदत होते. मुंबई शहरात पाच तालुके येत असून, ते शिधा नियंत्रक कार्यालयाशी संलग्न आहेत. त्यापैकी जवळपास ८ लाख ९० हजार ९४२ शिधापत्रिकाधारकांनी आपले मोबाइल लिंक केले आहेत. 

नागरिकांना आवाहन :

१)  सर्वच रेशनकार्डधारकांना आपले मोबाइल क्रमांक कार्डशी जोडणे गरजेचे आहे. 

२) ज्यांनी हे मोबाइल जोडले नसतील त्यांनी आपले मोबाइल क्रमांक रेशन दुकानात जाऊन जोडून घ्यावेत असे आवाहन उपनियंत्रक शिधा वाटप कार्यालयाने केले आहे. आतापर्यंत तब्बल ८ लाख रेशनकार्डधारकांनी मोबाइल क्रमांक जोडला आहे. 

एसएमएसद्वारे माहिती :

शासनाने आता सर्वच शिधापत्रिकाधारकांना त्यांना त्यांच्या कुटुंबप्रमुखांचे मोबाइल शिधावाटप प्रणालीशी लिंक करणे अनिर्वाय केले आहेत. त्यामुळे दुकानात धान्य उचलल्यावर त्याचा एसएमएस शिधापत्रिकाधारकांना येतो.

मोबाइल क्रमांक? 

१) शिधापत्रिकाधारकांना आपले मोबाइल क्रमांक शिधावाटप प्रणालीशी लिंक करण्यासाठी दुकानात जाऊन लिंक करून घ्यावा लागतो. 

२)  अथवा ऑनलाइन पद्धतीने मोबाइल लिंक करता येऊ शकतो.  

Web Title: someone else takes ration on ration card will receive a message on linked mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.