कोल्हापुरात शाहू महाराजांविरुद्ध मंडलीक; शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनाही उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:41 PM2024-03-28T19:41:05+5:302024-03-28T21:51:15+5:30

महाविकास आघाडीकडून काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत कोल्हापूर घराण्याच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Sanjay Mandalik against Shahu Maharaj in Kolhapur; Shinde also nominated the courageous Mane | कोल्हापुरात शाहू महाराजांविरुद्ध मंडलीक; शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनाही उमेदवारी

कोल्हापुरात शाहू महाराजांविरुद्ध मंडलीक; शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनाही उमेदवारी

मुंबई - महायुतीतील जागावाटप अंतिम निर्णय झाल्यानतंर अखेर शिवसेना शिंदे गटाच्या ८ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. त्यामुळे, बऱ्यापैकी लोकसभा उमेदवारांच्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रात लक्ष लागलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील दोन्ही विद्यमान खासदारांना शिदेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे, कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्याविरुद्ध संजय मंडलीक असा सामना रंगणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली होती.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत कोल्हापूर घराण्याच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील इतरही नेत्यांनी शाहू महाराजांना उमेदवारीसाठी आग्रह केला होता. त्यानंतर, शाहू छत्रपतींनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर, काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांची कोल्हापुरात जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे, कोल्हापुरात शाह महाराजांविरुद्ध उमेदवार कोण, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच, विद्यमान खासदार संजय मंडलीक यांना तिकीट मिळणार, की शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेकडून ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, कोल्हापूरसाठी संजय मंडलीक तर हातकणंगलेसाठी धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान खासदारांना पक्षाने पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये यंदा शाहू महाराज विरुद्ध  संजय मंडलीक असा सामना पाहायला मिळणार आहे. तर, हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंच्या विरोधात कोण, असा प्रश्न अद्यापही कायम आहे. कारण, महाविकास आघाडीने अद्यापही हातकणंगलेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, या जागेसाठी राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले जाऊ शकते. त्यामुळे, येथे यंदाही धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी असा सामना रंगणार आहे. 

हातकणंगले मतदारसंघातील गतवर्षीची आकडेवारी

1) धैर्यशील माने (शिव सेना) - 574077
2) खा.राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी) -480292
3) अस्लम सय्यद (वंचित बहुजन आघाडी) -120584
4) राजू मुजिकराव शेट्टी (बहुजन महा पार्टी) - 7971
 

Web Title: Sanjay Mandalik against Shahu Maharaj in Kolhapur; Shinde also nominated the courageous Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.