अमेरिकेतील नागरिकांना बंदी असलेल्या औषधांची विक्री, अंधेरीतील अवैध कॉल सेंटरवर कारवाई

By मनीषा म्हात्रे | Published: January 14, 2024 06:59 PM2024-01-14T18:59:28+5:302024-01-14T19:01:54+5:30

गुन्हे शाखेकडून १० जणांना बेड्या

Sale of banned drugs to US citizens, action against illegal call center in Andheri, 10 people arrested by crime branch | अमेरिकेतील नागरिकांना बंदी असलेल्या औषधांची विक्री, अंधेरीतील अवैध कॉल सेंटरवर कारवाई

अमेरिकेतील नागरिकांना बंदी असलेल्या औषधांची विक्री, अंधेरीतील अवैध कॉल सेंटरवर कारवाई

मुंबई : भारतात बंदी असलेल्या औषधांची अमेरिकेतील नागरिकांना विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अंधेरीतील कॉल सेंटर उद्ध्वस्त करत १० जणांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी साकीब सय्यद(३८), यश शर्मा(२६) यांच्यासह कॉलसेंटरमध्ये काम करणारे उजेर शेख(२६), जुनैद शेख(२२), गौतम महाडीक(२३), जीवन गौडा(२१), मुनीद शेख(४०), हुसैन शेख(२३), विजय कोरी(३८),  मोहम्मद सुफीयान मुकादम(२०) यांना अटक केली आहे. यातील शर्मा हा व्यवसायाने वकील असून तेथे विधी सल्लागार म्हणून काम करत होता. 

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील द समिट बिझनेस बेमधील(ओमकार) तिसऱ्या मजल्यावरील ग्लोबल सर्विसेस येथे अवैध कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शनिवारी गुन्हे शाखेने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत  साकीब मुस्ताक सय्यद (३८), यश शर्मा(२६) व एका साथीदाराच्या मदतीने अवैध कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासाठी आठ मुले कॉल सेंटरवर काम करत होते.

ते व्हिओआयपी यंत्रणेद्वारे अमेरिकेतील नागरिकांना विविध औषध कंपन्यांच्या नावाने दूरध्वनी करून व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो व ट्रेमोडोल या सारख्या प्रतिबंधात्मक औषधांची सलमान मोटरवाला या मुंब्रा येथे राहणाऱ्या व्यक्तीमार्फत विक्री करत असल्याचे समोर आले आरोपींनी केंद्र व राज्य सरकारचा महसुल बुडवून फसवणूक केली. याप्रकरणीय गुन्हा नोंदवत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. आरोपींकडे कॉल सेंटर चालवण्याचा कोणताही परवाना मिळून आलेला नाही. आरोपींनी अमेरिकतील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधांची विक्री केली असून त्याबाबत आता गुन्हे शाखा तपास करत आहे.

सर्व्हर डाऊन... 
या छाप्यानंतर याप्रकरणातील संशयीत इरफान कुरेशी, सलमान मोटरवाला व राशीद अन्सारी यांनी सर्वर बंद करून तेथील यंत्रणेतील फाईलही डिलिट करून पुरावे नष्ट केले. याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन मोबाईल, एक लॅपटॉप, एक सर्वर, २४ हार्ड डिस्क, एक राऊटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. डिलीट फाईल पुन्हा मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.

Web Title: Sale of banned drugs to US citizens, action against illegal call center in Andheri, 10 people arrested by crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.