होळीला गावी जाण्यासाठी गर्दी; रेल्वेला आणखी डबे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:15 AM2024-03-20T10:15:10+5:302024-03-20T10:16:15+5:30
पश्चिम रेल्वेने होळीनिमित्त गेल्या आठवड्याभरापासून देशभरातील विविध ठिकाणी विशेष गाड्या सोडण्याचा धडाका लावला आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेने होळीनिमित्त गेल्या आठवड्याभरापासून देशभरातील विविध ठिकाणी विशेष गाड्या सोडण्याचा धडाका लावला आहे. देशभरातून विविध ठिकाणी ४१ विशेष गाड्यांच्या सुमारे १४४ फेऱ्या, तर मुंबईहून देशाच्या विविध भागांमध्ये ११ विशेष गाड्या चालविल्या जात आहेत. तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी वेळोवेळी सध्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जात आहेत.
मुख्यतः अनेक गाड्या उत्तर भारतातील राज्यांसाठी आहेत आणि पाच गाड्या ईशान्यसाठी आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरत / उधना येथून ९ विशेष गाड्या चालविल्या जात आहेत, तर २१ गाड्या सुरत / उधना किंवा भेस्तानमधून जात आहेत. गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, ओखा, हापा, वलसाड आणि राजकोट या अन्य स्थानकांवरून १६ गाड्या चालवल्या जात आहेत.
१) अहमदाबाद-दानापूर विशेष ट्रेन, सुरत-बरौनी विशेष ट्रेन, उधना-आरा-वलसाड अनारक्षित सुपरफास्ट विशेष ट्रेन, उधना-आरा सुपरफास्ट विशेष, आरा-वलसाड सुपरफास्ट विशेष या सेवाही चालविल्या जात आहेत.
२) पश्चिम रेल्वेने विशेष भाड्यावर असलेल्या अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
३) यात उधना-बरौनी अनारक्षित विशेष ट्रेन, उधना-बरौनी स्पेशल, बरौनी-उधना स्पेशल, उधना-समस्तीपूर अनारक्षित विशेष ट्रेन, उधना-समस्तीपूर विशेष, समस्तीपूर-उधना विशेष ट्रेनचा समावेश आहे.