अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, दिंडोशी, वर्सोव्यात निघाल्या प्रचार फेऱ्या

By मनोहर कुंभेजकर | Published: May 7, 2024 01:09 PM2024-05-07T13:09:45+5:302024-05-07T13:11:18+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे उद्धव सेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दिंडोशी, वर्सोवा, गोरेगाव,आणी जोगेश्वरी विभागात प्रचार फेरी काढून जनतेशी संवाद साधला.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Inauguration of Amol Kirtikar's election office, campaign rounds in Dindoshi, Versova | अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, दिंडोशी, वर्सोव्यात निघाल्या प्रचार फेऱ्या

अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, दिंडोशी, वर्सोव्यात निघाल्या प्रचार फेऱ्या

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - महाविकास आघाडीचे उद्धव सेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दिंडोशी, वर्सोवा, गोरेगाव,आणी जोगेश्वरी विभागात प्रचार फेरी काढून जनतेशी संवाद साधला. विभागातील समस्या सोडविण्यासठी सतत झटणार असल्याचे आश्वासन त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार दरम्यान व निवडणूक कार्यालय उद्घाटन प्रसंगी दिले.

कीर्तिकर यांच्या वर्सोवा विधानसभा निवडणूक क्षेत्रातील मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन शिवसेना नेते, माजी मंत्री, विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांच्या हस्ते व काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, आपचे रूबेन मस्काराहंस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे मान्यवर नेते, कार्यकर्ते व वर्सोवा विधानसभेचे महिला व पुरुष पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ दिंडोशी विधानसभेत 'हनुमान टेकडी ते त्रिवेणीनगर' येथे 'प्रचार फेरी' आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रचारफेरीत स्थानिक रहिवाशांशी त्यांनी संवाद साधला. ठिकठिकाणी माता भगिनींनी त्यांचे औक्षण केले. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले व निवडणुकीसाठी शुभेच्छा देत प्रचार फेरीत सहभागी झाले. यावेळी अमोल कीर्तिकर यांना संसदेत पाठविणार असा निर्धार शिवसेना नेते व आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Inauguration of Amol Kirtikar's election office, campaign rounds in Dindoshi, Versova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.