महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 07:02 AM2024-04-28T07:02:21+5:302024-04-28T07:03:08+5:30

ठाण्याची जागा शिंदेसेनेला की भाजपला, हा फैसला अजूनही होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा त्यांच्या पक्षाला मिळावी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.

lok sabha election 2024 Mahayuti's rift of five seats remained | महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच

महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच

मुंबई - ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, कल्याण आणि नाशिक या पाच लोकसभा जागांबाबतचा महायुतीचा तिढा अद्यापही  सुटलेला नाही. आपसांत मोठी रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

ठाण्याची जागा शिंदेसेनेला की भाजपला, हा फैसला अजूनही होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा त्यांच्या पक्षाला मिळावी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. कल्याणमध्ये शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे; मात्र ठाण्यासह अन्य जागांचा निर्णय होत नसल्याने कल्याणमधील जागेचे घोडेही अडले आहे.

सध्याचे खासदार हेमंत गोडसे उमेदवारी नक्की असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे भाजप आणि अजित पवार गटानेही या जागेवरील आग्रह सोडलेला नाही. पालघरमध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदेसेनेचे आहेत; पण ही जागा शिंदेसेनेकडेच राहणार की भाजपकडे जाणार हे अद्याप ठरू शकलेले नाही. दक्षिण मुंबईसाठीचा आग्रह शिंदेसेनेने अद्याप सोडलेला नाही; पण भाजपला ही जागा हवी आहे. त्यामुळे सस्पेन्स कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपकडे गेली, औरंगाबादची शिंदेसेनेकडे गेली; पण पाच जागा अजूनही अडकल्या आहेत. आघाडीने तिथे आधीच उमेदवार जाहीर केले आहेत.

Web Title: lok sabha election 2024 Mahayuti's rift of five seats remained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.