माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:16 PM2023-11-20T20:16:59+5:302023-11-20T20:17:36+5:30

जर तुमचे लोक लंडनला जातात, काय काय करतात हे डिक्टेटिव्ह एजन्सी लावली तर राजकारणाचा काय स्तर राहील? असा सवाल त्यांनी विचारला. 

Keep my 25 lakhs with you and get good treatment; Mohit Kamboj targets Sanjay Raut | माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला

माझे २५ लाख तुमच्याकडेच ठेवा अन् चांगले उपचार घ्या; कंबोज यांचा राऊतांना सल्ला

मुंबई - संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील फोटो ट्विट करत एका रात्रीत साडे तीन कोटी उधळल्याचा आरोप केला. त्यावर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले. मोहित कंबोज यांनी राऊतांच्या आरोपांवर पलटवार करताना त्यांना २५ लाखांची आठवण करून दिली आहे. माझे तुमच्याकडे २५ लाख आहेत. जे आजपर्यंत तुम्ही मला दिले नाही. तुम्ही हे पैसे वापरून चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्या. तुम्ही माझे जुने मित्र आहात. कितीदा आपण हयातला बसलोय.अनेकदा तुम्ही माझ्या घरी आलात. मागील २०१९ पासून तुमचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत असल्याचे पाहून मला दु:ख होते असा खोचक सल्ला कंबोज यांनी संजय राऊतांना दिला आहे. 

मोहित कंबोज म्हणाले की, संजय राऊत यांनी राजकारण सोडून लोकांच्या खासगी आयुष्यात कोण कुठे जाते हे पाहण्यासाठी डिक्टेटिव्ह एजन्सी उघडली आहे. सलीम जावेद जोडीतील जावेद भाईंनी फोटो ट्विट करत बावनकुळे कुटुंब परदेश दौऱ्यावर गेलेले फोटो पोस्ट केले. बावनकुळे कॅसिनो खेळत असले तरी भारतात गोव्यात कॅसिनो अधिकृत आहे. कुटुंब फिरायला गेले असताना इतक्या खालच्या पातळीचे राजकारण संजय राऊत करतायेत. जर तुमचे लोक लंडनला जातात, काय काय करतात हे डिक्टेटिव्ह एजन्सी लावली तर राजकारणाचा काय स्तर राहील? असा सवाल त्यांनी केला. 

त्याचसोबत तुमचे वय वाढत चाललंय, कदाचित तुम्ही अशा आजाराचे पीडित आहात. ज्याचा उपचार व्हायला हवा. संजय राऊतांची मानसिकता खराब झालीय. त्यांचे मानसिक संतुलन ढासळलंय. त्यामुळे तुम्ही माझ्या पैशातून चांगला उपचार घ्या आणि बरे व्हा अशी माझी अपेक्षा आहे. नवीन वर्षात देव तुम्हाला सद्बुद्धी देवो या सदिच्छा आहेत असंही कंबोज यांनी म्हटलं. 

Web Title: Keep my 25 lakhs with you and get good treatment; Mohit Kamboj targets Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.