मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताची दोन रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

By रेश्मा शिवडेकर | Published: April 18, 2024 07:56 PM2024-04-18T19:56:06+5:302024-04-18T19:56:15+5:30

हरियाणाच्या लारिसा आणि पुण्याच्या सई पाटील यांनी कांस्य पदकांवर नाव कोरले.

India won two silver and bronze medals in the European Mathematical Olympiad for girls | मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताची दोन रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताची दोन रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

मुंबई : जॉर्जिया येथे झालेल्या १३व्या मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली. ११ ते १७ एप्रिलदरम्यान ही ऑलिम्पियाड पार पडली. यात भारतातून चार मुलींचा संघ सहभागी झाला होता. यातील हरियाणाच्या गुंजन अग्रवाल आणि केरळच्या संजना चाको या विद्यार्थिनींनी रौप्य पदकेपटकावली. तर हरियाणाच्या लारिसा आणि पुण्याच्या सई पाटील यांनी कांस्य पदकांवर नाव कोरले.

या भारतीय संघाचे नेतृत्व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे साहिल म्हसकर, अदिती मुथखोड आणि अनन्या रानडे यांनी केले. या तिघांचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थिनींना लाभले. या आधी २०१५मध्ये भारताने मुलींच्या युरोपीय गणित ऑलिंपियाडमध्ये अशी कामगिरी केली होती. या संघाला होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे मोलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. अणुऊर्जा विभागाच्या नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्सच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला.

Web Title: India won two silver and bronze medals in the European Mathematical Olympiad for girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.