पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:13 AM2024-05-14T09:13:28+5:302024-05-14T09:14:37+5:30

Ghatkopar Hoarding Accident - शहरातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या जवळपास ७८ जण जखमी झाले, तर १४ जणांचे बळी गेले.

ghatkopar hoarding accident: Bharat Rathod, a youth who had gone to fill petrol, was crushed to death under the hoarding | पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत

पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत

मुंबई - सोमवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. शहरात या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर इथं मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी महाकाय होर्डिंग वाऱ्यामुळे खाली पेट्रोल पंपावर कोसळले तेव्हा पंपावर पेट्रोल भरायला गेलेले अनेकजण त्याखाली अडकले. या दुर्घटनेने १४ बळी घेतले. यात २४ वर्षीय युवकाचाही समावेश होता. पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला अशी परिस्थिती युवक भरत राठोडवर ओढावली. 

भरत राठोड हा युवक मेडिकलमध्ये डिलिव्हरीचं काम करायचा. पेट्रोल भरण्यासाठी भरत पेट्रोल पंपावर गेला होता. त्याचवेळी होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली. त्यात भरतचा दुर्दैवी अंत झाला. भरत हा घाटकोपरच्या गोळीबार परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत स्थानिक रहिवाशी सांगतात की, भरतच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे. त्याच्या घरात कमावणारे कुणी नाही. अलीकडेच आजारपणामुळे त्याच्या वडिलांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. १०-१२ दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते, नुकतेच त्यांना डिस्चार्ज दिलाय आणि आज हा प्रसंग घडला. कोरोना काळात आईचे निधन झालं असंही त्यांनी सांगितले. 

४ तासांचा थरार, जखमी गुप्ता यांची सुटका

रमाबाई परिसरात राहणाऱ्या गुप्ता कुटुंबातील अशोक गुप्ता हे ९० फूट रोड परिसरात गॅरेजमध्ये काम करतात. सायंकाळी दुचाकीवरून ते पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले. त्यावेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पेट्रोल भरून ते पैसे देणार इतक्यात त्यांच्या अंगावर होर्डिंग कोसळले. नेमकं काय झालं हे क्षणभर काहीच कळलं नाही. त्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करून मदत मागितली. मी आतून आवाज देत होतो. पण माझ्यापर्यंत मदत पोहचत नव्हती. ४ तास मी आतमध्ये होतो. माझी शुद्ध हरपली त्यानंतर थेट रुग्णालयात जाग आल्याचं जखमी अशोक गुप्ता यांनी सांगितले. 

राज्य सरकारनं घेतली गंभीर दखल, होर्डिंगधारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जे कोणी होर्डिंगधारक आहेत त्यांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही. या घटनेनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत सरकार करेल असं त्यांनी सांगितले. 

Web Title: ghatkopar hoarding accident: Bharat Rathod, a youth who had gone to fill petrol, was crushed to death under the hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.