बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना ‘व्हायरल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:49 AM2019-11-04T02:49:06+5:302019-11-04T02:49:39+5:30

काळजी घेण्याचे आवाहन : सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढले

Due to changing environment, Mumbais go 'viral' infection | बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना ‘व्हायरल’

बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना ‘व्हायरल’

Next

मुंबई : कधी कडक ऊन, कधी पाऊस असे विचित्र वातावरण सध्या मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, जंतुसंसर्गामुळे उद्भवणाºया व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकला, ताप असे व्हायरल आजार पसरत आहेत. ‘व्हायरल इन्फेक्शन’ झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. या वर्षी आॅक्टोबर हीटच्या काळात उन्ह आणि पावसाची रिपरिप, तर रात्री गारवा असे विचित्र वातावरण आहे. मुंबईकरांना मध्येच भिजावे लागते आणि मध्येच अंगाला चटके देणारे ऊन व घामाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य ताप येत आहे. दररोज दवाखान्यात ७ ते ८ रुग्ण तापाचे येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, पण हे व्हायरल इन्फेक्शन असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात रस्त्यात, गल्लीत साचणारे पाणी यामुळे शरीरावर खाज येते, असे रुग्णदेखील येतात. रस्त्यावरील नियमित न उचलला जाणारा कचरा यामुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे, असे फिजिशियन डॉ. नारायण काशीद यांनी सांगितले.
हवेतील आर्द्रता वाढली असून, व्हायरल इन्फेक्शन पसरविणाºया जंतुंचा संसर्ग हवेत मोठ्या प्रमाणात वाढतो. या इन्फेक्शनचा सर्वात जास्त त्रास हा लहान मुलांना, गर्भवती महिला, वयोवृद्ध यांना होत आहे. लहान मुलांमध्ये ताप, उलट्या, सर्दी, खोकला, या व्हायरल तापाची लक्षणे आहेत. ताप येतो-जातो, भूक कमी होणे, अंग दुखणे, घसा दुखणे, डोळे दुखणे आणि सांधे दुखणे ही लक्षणेदेखील दिसून येतात. पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.

घशाच्या संसर्गातही वाढ
यंदा फटाक्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी या फटाक्यांच्या धुरामुळे घशाचा संसर्ग वाढला आहे. लहानग्यांपासून सर्व वयोगटांतील रुग्णांना घशाच्या तक्रारी दिसून येत आहेत़ दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमध्येही तेल, तुपाचे प्रमाण अधिक असल्याने या तक्रारी असल्याची शक्यता आहे.
- डॉ. जयेश पवार, कान-नाक-घसाविकारतज्ज्ञ

च्सर्वात प्रथम अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
च्पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा.
च्पाणी उकळून प्या.
च्गरमीपासून वाचण्यासाठी थंड पाण्याचा मारा सतत करू नका.
च्गर्दीच्या ठिकाणी जास्त फिरू नका.
च्जमल्यास तोंडाला मास्क वापरा.
च्सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्या.
 

Web Title: Due to changing environment, Mumbais go 'viral' infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.