महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या स्वाती सिंह यांचा देवेंद्र फडणवीसांनी केला गौरव

By मनोहर कुंभेजकर | Published: March 14, 2024 03:23 PM2024-03-14T15:23:12+5:302024-03-14T15:23:27+5:30

उपमुख्यमंत्र्यांनी स्वातीच्या कार्याचे कौतुक केले आणि त्या इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

Devendra Fadnavis praised Swati Singh who made women self-reliant | महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या स्वाती सिंह यांचा देवेंद्र फडणवीसांनी केला गौरव

महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या स्वाती सिंह यांचा देवेंद्र फडणवीसांनी केला गौरव

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार, स्टार्ट अप इंडिया अंतर्गत असीम शक्ती फाउंडेशनची स्थापना करत महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या स्वाती सिंह यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या हस्ते त्यांच्या सागर बंगल्यात गौरव करण्यात आला. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा, विजय सिंह देखील उपस्थित होते.

“रेडी टू वेअर साडी विथ पॉकेट्स” या संकल्पनेचे पेटंट घेऊन स्वाती सिंह यांनी भारतीय पोशाख बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबरआर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी स्वातीच्या कार्याचे कौतुक केले आणि त्या इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

 क्रियेटर अवॉर्ड सोहळ्यात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आता रेडीमेडचे युग आहे.  पगडी घालण्याऐवजी आजचा तरुण रेडिमेड पगडी घालतो, आता रेडिमेड धोतरही बाजारात आले आहे.  मुलींना सहज भारतीय कपडे घालता यावेत यासाठी रेडीमेड साड्याही बनवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले होते.  तर गेल्या काही वर्षांपासून स्वाती सिंह यांची संस्था असीम शक्ती फाउंडेशन महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा उपक्रम राबवत असून त्यांचा कारखाना अंधेरीतील एका झोपडपट्टीत आहे.

Web Title: Devendra Fadnavis praised Swati Singh who made women self-reliant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.