Devendra Fadanvis: "नवनीत राणांबाबत जे झालं, तेव्हा सुप्रिया सुळे काहीही बोलल्या नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:39 PM2022-05-17T22:39:16+5:302022-05-17T22:41:12+5:30

Devendra Fadanvis: गृहमंत्री आपल्या पक्षाचा आहे, म्हणूनच पोलिसांसमक्ष आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत

Devendra Fadanvis: "Supriya Sule didn't say anything about what happened to Navneet Rana." | Devendra Fadanvis: "नवनीत राणांबाबत जे झालं, तेव्हा सुप्रिया सुळे काहीही बोलल्या नाहीत"

Devendra Fadanvis: "नवनीत राणांबाबत जे झालं, तेव्हा सुप्रिया सुळे काहीही बोलल्या नाहीत"

Next

मुंबई - केंद्रीयमंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला मारहाण झाल्याचे समोर आले होते. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी या मारहाणीविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आता, सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेनंतर फडणवीसांनी त्यांच्या भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

गृहमंत्री आपल्या पक्षाचा आहे, म्हणूनच पोलिसांसमक्ष आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. आम्ही लोकशाही मानणारे लोकं आहोत, म्हणून पहिल्यांदा तक्रार करू पण कारवाई झाली नाही, तर आम्हीही सोडणार नाही. सुप्रिया ताईंनी सगळ्याच बाबतीत हा निर्णय घ्यायला हवी. यापूर्वी नवनीत राणा यांच्याबाबतीत जे झालं, तेव्हा त्या काहीही बोलल्या नाहीत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंची भूमिका सोयीची असल्याचं सूचवलं. तसेच, अनेक महिलांवर ज्यावेळी हल्ले झाले, तेव्हाही सुप्रिया सुळे काही बोलल्या नाहीत. भाजपच्याही महिलांना पोलिसांनी जी वागणूक दिली, त्यावेळी त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे, त्यांनी वारंवार ही भूमिका घ्यावी आम्ही त्यांचं स्वागत करू, असेही फडणवीस यांनी म्हटलं. 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात या मारहाणीच्या घटनेचा निषेध करताना म्हणाल्या की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान-सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्टात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावत हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत:त तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

काय आहे प्रकरण

बालगंधर्व सभागृह येथील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Devendra Fadanvis: "Supriya Sule didn't say anything about what happened to Navneet Rana."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.