'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 08:56 AM2023-02-04T08:56:15+5:302023-02-04T08:56:26+5:30

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

BJP leader Ashish Shelar has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | '...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

'...तर तुम्हाला न्यायालयातच घर बांधावे लागेल'; आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

Next

मुंबई- खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. सार्वजनिक मंचावरुन नारायण राणे यांनी खोटे आरोप केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.नारायण राणे यांनी या नोटीसनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. 

माणसाने भाजपच्या नादाला लागून किती खोटे बोलावे याला ही काही मर्यादा आहेत. नारायण राणेंनी सतत माझ्याविषयी काही वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशाप्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. 

संजय राऊतांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवल्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना नोटीस पाठवण्याचा अधिकार पण तुमचं बोलणं, भाषा यावर जर केसेस झाल्या तर राऊत यांना एखाद्या न्यायालयातच घर बांधावं लागेल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला. नारायण राणे उद्या आपणच बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुखपदी नियुक्ती केली असंही म्हणतील, असं संजय राऊत म्हणाले. "नारायण राणे म्हणतात २००४ साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. नारायण राणे काहीही वक्तव्य करु शकतात. २००४ साली मी सामनाचा संपादक होतो. माझे मतदारयादीत नाव नाही असेही म्हणाले. आता २५ वर्षापासून मी मतदान करत आहे. माझे शिक्षण मुंबईत झाले. मी देशाचा नागरिक आहे. मला मतदानाचा हक्क आहे. २००४ साली देखील माझे नाव मतदार यादीत होते", असं संजय राऊत म्हणाले.

Web Title: BJP leader Ashish Shelar has criticized Thackeray group MP Sanjay Raut.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.