Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 08:27 PM2024-05-15T20:27:25+5:302024-05-15T20:30:20+5:30

Anil Desai vs Congress Video: ठाकरे गटाकडे अनिल देसाई यांच्या विरोधात महायुतीच्या राहुल शेवाळेंचे आव्हान आहे.

Anil Desai was initially stopped by congress in Chembur Panjarpol area then allowed to rally and supported | Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?

Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?

Anil Desai vs Congress Video: दक्षिण-मध्य मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासोबत आज एक विचित्र किस्सा घडला. चेंबूरमध्ये अनिल देसाई प्रचारासाठी गेले असताना पांजरपोळ परिसरात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना कडाडून विरोध केला. घटनास्थळी उबाठा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ वाद झाल्याचेही दिसले. पण नंतर गैरसमजातून हा गोंधळ झाल्याचे सजमताच हेच काँग्रेस कार्यकर्ते अनिल देसाईंना खांद्यावर घेऊन नाचले.

गोंधळ, वाद... नक्की काय घडले?

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई प्रचारसभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजरपोळ मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावे, प्रचार करू नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये बराच वेळ तू तू-मैं मैं झाली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

बाचाबाची नंतर पुढे काय झाले?

निवडणुकीला आता अवघे चारच दिवस राहिले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये गैरसमजातून ही घटना घडली. गैरसमजातून गोंधळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही गटांचे मनोमिलन झाले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल देसाई यांना खांद्यावर घेऊन नाचले आणि सर्व काही सुरळीत झाले.

Web Title: Anil Desai was initially stopped by congress in Chembur Panjarpol area then allowed to rally and supported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.