पुन्हा एकदा प्रेक्षकांना सैराट करण्यास रिंकू सज्ज; आता झळकणार 'या' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 11:48 AM2022-05-22T11:48:09+5:302022-05-22T11:48:30+5:30

Rinku rajguru: रिंकूने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे.

marathi actress rinku rajguru upcoming movie aathva rang premacha | पुन्हा एकदा प्रेक्षकांना सैराट करण्यास रिंकू सज्ज; आता झळकणार 'या' चित्रपटात

पुन्हा एकदा प्रेक्षकांना सैराट करण्यास रिंकू सज्ज; आता झळकणार 'या' चित्रपटात

Next

आर्ची म्हणून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी आणि पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना सैराट करुन सोडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर रिंकूने मोठा चाहतावर्ग निर्माण केला. सैराटनंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' अशा काही चित्रपटांसह वेबसीरिजमध्येही झळकली. विशेष म्हणजे येत्या जून महिन्यात रिंकू पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रिंकूने अलिकडेच तिच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नव्या चित्रपटाची आणि तिच्या भूमिकेची चाहत्यांना ओळख करुन दिली आहे. 

रिंकूने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये तिचा चित्रपटातील लूकदेखील रिव्हील करण्यात आला आहे. सोबतच ती कोणती भूमिका साकारणार हेदेखील तिने सांगितलं आहे. रिंकू लवकरच आठवा रंग प्रेमाचा या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटात रिंकू कृतिका ही भूमिका साकारत असून हा चित्रपट येत्या १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुशबू सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर सोमवारी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, 'तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू... 'कृतिका'च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू. टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!..' असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. रिंकूने यापूर्वी सैराट, कागर, मेकअप, 200 हल्ला हो, अनपॉज्ड, १०० या चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: marathi actress rinku rajguru upcoming movie aathva rang premacha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.