अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 08:43 AM2024-05-05T08:43:33+5:302024-05-05T08:43:51+5:30

सुमारे पाच वर्षांनंतर पृथ्वीवर आदळणार म्हणून सांगण्यात आलेल्या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे.

The Apophis asteroid will not 'take another Lonar '; Da. Kr. Soman's information | अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती

अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सुमारे पाच वर्षांनंतर पृथ्वीवर आदळणार म्हणून सांगण्यात आलेल्या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. शुक्रवार १३ एप्रिल २०२९ रोजी अपोफिस नावाचा ३४० किलोमीटर आकाराचा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती; पण हा लघुग्रह पृथ्वीवर न आदळता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ३२ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 

या लघुग्रहाचा शोध तीन शास्त्रज्ञांनी १९ जून २००४ रोजी लावला होता. शास्त्रज्ञ यावर नजर ठेवून होते. अधिक चैत्र कृष्ण अमावास्या शुक्रवार १३ एप्रिल २०२९ हा दिवस मोठा धोक्याचा दिवस समजला जात होता. कारण हा लघुग्रह या दिवशी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती; पण आता नव्या संशोधनानुसार या दिवशी हा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३२ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. त्या दिवशी पृथ्वीच्या काही भागातून हा लघुग्रह साध्या डोळ्यांनीही पाहता येईल, असे सोमण यांनी सांगितले. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर आकाराचा २० लाख टन वजनाचा एक अशनी पाषाण लोणार येथे आदळला होता. 

आजही तेथे दोन किलोमीटर व्यासाचे दीडशे मीटर खोल अशनी विवर पाहण्यास मिळते. आता अंतराळ विज्ञानात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे एखादा धुमकेतू किंवा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाल्यास शास्त्रज्ञ पृथ्वीला नक्कीच सुरक्षित ठेवू शकतील. त्यामुळे चिंता 
करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The Apophis asteroid will not 'take another Lonar '; Da. Kr. Soman's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lonarलोणार