पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:45 AM2024-05-13T10:45:31+5:302024-05-13T10:46:55+5:30

घुमटवाडी येथील मतदान केंद्रावरील अधिकारी हे सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Sujay Vikhe Patil's campaign leaflets with polling staff in Pathardi, Ghumatwadi villagers object in Ahmednagar lok sabha Election | पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप

पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप

अहमदनगर- अहमदनगर लोकसभा आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. परंतु पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवार यांच्या प्रचाराचे पत्रक मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे आढळून आले आहेत. यानंतर ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेतला आहे.

घुमटवाडी येथील मतदान केंद्रावरील अधिकारी हे सुजय विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना कळवले देखील होते. परंतु या संदर्भात कोणतेही कार्यवाही झाली नाही. यानंतर आज सकाळी हा प्रकार आढळून आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बाहेरच्या व्यक्तीने पत्रक टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या मतदान केंद्रावरील टीम बदलण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे, ते कर्मचारी कोणत्या संस्थेवरील आहेत या संदर्भात अजून माहिती उपलब्ध नाही. मतदान प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचारी घेतले होते. आदल्या दिवशी ग्रामस्थांच्या कोणत्याही तक्रारी आल्या नव्हत्या, असे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले.

Web Title: Sujay Vikhe Patil's campaign leaflets with polling staff in Pathardi, Ghumatwadi villagers object in Ahmednagar lok sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.