ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:20 PM2024-03-28T19:20:38+5:302024-03-28T19:21:08+5:30

Loksabha Election 2024: पहिल्या यादीत कोणत्या उमेदवारांना मिळाली संधी? पाहा...

Shivsena Candidate List: First list of 8 Shiv Sena candidates released | ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट

ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट

Shivsena Shinde Group Candidate List: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे.

शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने,  मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव आणि शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. दरम्यान, या यादीत रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

"१४ वर्षाचा वनवास संपला, जिथं रामराज्य..."; गोविंदानं हाती घेतलं 'धनुष्यबाण'

या पाच जागांबाबत सस्पेन्स कायम

शिंदे गटाने पहिल्या यादीत नाशिक, ठाणे, वाशिम-यवतमाळ, मुंबई उत्तर पश्चिम आणि कल्याण या जागेवरील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. त्यामुळे या जागांवर वाद असल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या आणि वाशिम-यवतमाळमध्ये भावना गवळींच्या नावाला भाजपचा विरोध आहे, तर दुसरीकडे कनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावर भाजपने दावा केला आहे. आता या जागांबाबत काय निर्णय होणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Web Title: Shivsena Candidate List: First list of 8 Shiv Sena candidates released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.