सनफिस्ट मारी लाइटसोबतचा 'कपल फोटो' पाठवा, युरोप टूरवर जाण्याची संधी मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:12 PM2024-05-08T15:12:45+5:302024-05-08T15:13:40+5:30

सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडिया एकत्र येऊन राबवत आहे एक आगळावेगळा उपक्रम - "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी"

send a couple photo with Sunfeast Marie light and get a chance to win europe tour or domestic tour | सनफिस्ट मारी लाइटसोबतचा 'कपल फोटो' पाठवा, युरोप टूरवर जाण्याची संधी मिळवा!

सनफिस्ट मारी लाइटसोबतचा 'कपल फोटो' पाठवा, युरोप टूरवर जाण्याची संधी मिळवा!

चहा आणि गप्पा यांचं नातं काही औरच. एखाद्या कट्ट्यावर, ऑफिसजवळच्या नाक्यावर गरमागरम चहाचा आस्वाद घेत मित्र-मैत्रिणींच्या गप्पा रंगल्याचं चित्र आपण पाहतोच; पण सुटीच्या दिवशी निवांत क्षणी नवरा-बायकोही चहासोबत हलक्याफुलक्या गप्पांमध्ये, जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. चहासोबत सनफिस्ट मारी लाइट असेल तर मग वातावरण अधिकच 'लाइट' होऊन जातं आणि नातं एकदम 'स्ट्राँग' होतं. हे बंध आणखी घट्ट करण्यासाठी सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडिया एकत्र येऊन राबवत आहे एक आगळावेगळा उपक्रम - "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी"

सनफिस्ट मारी लाइटने, महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय सेलिब्रिटी कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांनाही या उपक्रमाशी जोडलं आहे. हे बिस्किट त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे आणि सोबतच त्यांच्या नात्यातील गोडवा देखील वाढवत आहे. सनफिस्ट मारी लाइटसोबतच्या लाइट क्षणांचे त्यांचे फोटोही खूप गोड आहेत. 

महाराष्ट्रातील जोड्यांना युरोप टूर जिंकण्याची संधी

या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील 'स्ट्राँग जोड्यां'ना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक छोटी आणि सोपी कॉन्टेस्ट. यात तुम्हाला तुमचा आणि जोडीदाराचा Sunfeast Marie light सोबत फोटो काढायचाय आणि तो 8286634500 या WhatsApp नंबरवर पाठवायचाय. 'लाइट' क्षणांचे हे फोटो विजेत्या जोड्यांना युरोपची सैर घडणार आहेत. त्यासोबत काही जोड्यांना डोमेस्टिक ट्रिपवर जाण्याची संधीही मिळणार आहे.  

मग वाट कसली बघताय?... मस्तपैकी तयार व्हा आणि सनफिस्ट मारी लाइटसोबत एक झक्कास कपल फोटो काढा आणि १३ मे २०२४ पर्यंत 8286634500 नंबरवर  WhatsApp करा. हे Light क्षण बनवतात एक Strong जोडी.

Web Title: send a couple photo with Sunfeast Marie light and get a chance to win europe tour or domestic tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.